माझ्या गावा वर छोटा निबंध | Short Essay On My Village In Marathi

आजचा हा निबंध माझे गाव या विषयावर (Short Essay On My Village In Marathi) आहे. माझे गाव या विषयावर आह्मी आधीच 2 निबंध लिहिलेले आहे जे तुम्ही बघू शकता. ते दोन निबंध 700 ते 800 शब्दांचे आहे.

आज जो निबंध आम्ही लिहिलेला आहे तो चारशे शब्दांचा आहे. हा निबंध मी वर्ग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 च्या विद्यार्थ्यांकरिता लिहिलेला आहे.


माझ्या गावा वर छोटा निबंध | Short Essay On My Village In Marathi


माझे गाव हे खूप लहान गाव आहे. माझे गाव महाराष्ट्र राज्य नागपूर जिल्ह्यात आहे. माझ्या गावाचे नाव रामपूर आहे. आमच्या गावात आमची मातृभाषा म्हणजेच मराठी बोलली जाते.

माझे गाव खुप सुंदर आहे आणि या सुंदर तेचे कारण गावात असणारे शेत आहे. माझ्या गावाच्या परिसरात अनेक प्रकारचे फुले आणि फळांची झाडे बघायला मिळतात.

माझ्या गावात खूप शांतता आहे ज्यामुळे सकाळी आमच्या गावात पक्षांची आवाज ऐकायला मिळते. माझ्या गावातील सर्व लोक एकमेकांसोबत चांगले वर्तन करतात. माझ्या गावातील सर्व लोक मिळून मिसळून राहतात. माझ्या गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे.

माझ्या गावा मध्ये एक नदी आणि एक लहान तलाव आहे. जिथे मी रोज आंघोळ करायला माझ्या मित्रांसोबत जात असतो. त्याच तलावाजवळ एक मोठे वडाचे झाड आहे. या झाडाखाली संध्याकाळी आमच्या गावातील म्हातारे लोक बसतात व गप्पागोष्टी करतात.

आमच्या गावात प्रत्येक चौकात लहान मुले निरनिराळे खेळ खेळताना दिसतात. आज पण आमच्या गावात आमच्या काकू दही पासून तूप बनवितात.

माझ्या गावामध्ये एक शाळा आहे ज्या शाळेत आम्ही सर्व मुले शिकायला जातो. आमच्या शाळेमध्ये वर्ग पाच पर्यंत शिकवले जाते.

आमच्या शाळेमध्ये वीज आणि पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था केलेली आहे. आमच्या गावात एक छोटी पुस्तकालय आणि एक रुग्णालय सुद्धा आहे.

माझ्या गावांमध्ये पाण्याचे धरण आहे. त्या पाण्याच्या धरणाला बघण्याकरिता दुरून दुरून पावसाळ्याच्या दिवसात लोक येतात. पावसाळ्याच्या दिवसात आमच्या गावातील धरण पूर्णपणे भरून जात असते.

माझ्या गावात प्रत्येक गुरुवारी बाजार भरत असतो. जिथे मी माझ्या बाबांसोबत फळे आणि भाज्या विकायला घेऊन जात असतो.

आमच्या गावात कपडे आणि इतर वस्तू साठी दुकाने नाहीत. ज्यामुळे कपडे आणि इतर वस्तू घेण्याकरिता आम्हाला शहरात जावे लागते.

माझ्या गावात सर्व उत्सव मिळून-मिसळून साजरे केले जातात. माझ्या गावामध्ये आम्ही मैदानात जाऊन क्रिकेट, खो खो, कबड्डी यांसारखे खेळ खेळतो.

आमच्या गावा मध्ये वाहने खूप कमी चालतात. त्यामुळे आमच्या गावात प्रदूषण खूप कमी असते. आणि प्रदूषण कमी असल्यामुळे आमच गाव हिरवे आणि गावातील हवा शुद्ध असते.

आमच्या गावात एक फार्म हाऊस आहे. जिथे शहरातील लोक निसर्गाची सुंदरता बघायला येतात. फार्म हाउस मध्ये राहायला येणारे लोक गावातील शुद्ध हवेचा आनंद घेतात.

गावांमध्ये सकाळी सकाळी गायला बांधले जाते व तिचे दूध काढून दूधवाले काका दूध विकायला नेतात. आमच्या गावा मध्ये पोळा सण खूप मोठा जोराने साजरा केला जातो. आमच्या गावात अजूनही आधुनिक सुविधा पूर्णपणे आलेल्या नाहीत.

आमच्या गावातील रोड अजूनही कच्ची आहेत. माझी एकच इच्छा आहे की चांगले शिक्षण घेऊन मी माझ्या गावाच्या प्रगतीत मदत करील. आणि माझ्या गावातील लहान मुलांना योग्य शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करेन.

मी शिकून कितीही मोठा झालो तरी माझ्या गावाला विसरणार नाही आणि माझ्या गावातील लोकांची नेहमी मदत करत राहील.


मित्रांनो माझे गाव यावर छोटा निबंध (Short Essay On My Village In Marathi)  तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि हा निबंध आवडला असेल तर याला सोशल मीडियावर शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यास मदद करा.

Sharing is caring!

Leave a Comment