माझं गाव मराठी निबंध | My Village Essay In Marathi

आज आपण माझ गाव विषयावर निबंध (My Village Essay In Marathi) लिहिणार आहोत. आजच्या या निबंध मध्ये आपण आपल्या गावातील समस्या व झालेल्या प्रगती बद्दल बोलणार आहोत.

आजचा निबंध वर्ग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 च्या विद्यार्थ्यांकरिता लिहिलेला आहे. तसेच आजचा हा निबंध कॉलेज चे विद्यार्थी सुद्धा लिहू शकतात.


माझं गाव मराठी निबंध | My Village Essay In Marathi


भारत देश हा एक असा देश आहे जो हजारो गाव मिळून बनलेला आहे. आपल्या देशाची ५० ते ७० % लोकसंख्या ही गावा मधे राहते. गावातील जीवन शहरात राहणाऱ्यांच्या जीवनापेक्षा वेगळी असते. गावाचे वातावरण हे खूप आनंद मय आणि शांत असते.

गावामध्ये गेल्याने आपल्या भारताची खरी संस्कृती बद्दल माहिती मिळते. जर तुम्ही शहरात गेले तर तिथे तुम्हाला सर्व उत्सव साजरे करताना दिसतात. परंतु शहरांमध्ये तुम्हाला भारताची परंपरागत उत्सव साजरे कसे करतात बघायला मिळत नाही.

गावांमध्ये सर्व उत्सव परंपरा गतीने साजरे केले जातात याचे कारण हेच की आज शहरात जितके पण लोक राहतात ते आधुनिक जगाच्या विचाराचे असतात. आणि दुसरीकडे गावांमध्ये राहणारे लोक जुन्या पद्धतीचे असतात. ज्यामुळे त्यांना जुन्या पद्धती आणि परंपरांबद्दल जास्त माहिती असते.

गावातील लोक खूप प्रेमळ आणि स्वभावाने गोड असतात. गावामध्ये तुम्हाला शुद्ध हवा घ्यायला मिळते. कारण शहरांमध्ये होणारे प्रदूषण दिवसें दिवस वाढत चालले आहे. ज्यामुळे शहरांमधली हवा दूषित झाली आहे.

एकीकडे शहरांमध्ये आपल्याला मोठ मोठ्या इमारती बघायला मिळतात. तर गावांमध्ये आपल्याला निसर्गाची सुंदरता बघायला मिळते. भारताची कृषी व्यवस्था ही भारताच्या गावांवर आधारित आहे. कारण गावामध्ये सर्व शेतकरी राहतात. गावांच्या चारी कडे शेती करण्याकरिता शेत असतात.

या शेतामध्ये शेतकरी शेती करून पीक पिकवतो आणि त्या पिकांना बाजारात विकून जे पैसे मिळतात त्यांचा वापर करून आपले घर चालवत असतो. गावांमध्ये तलाव आणि नद्या असतात. तलाव आणि विहिरी मध्ये साचलेल्या पाण्याचा वापर करून शेतकरी शेतीला पाणी पुरवत असतो.

गावामध्ये शेती शिवाय पशुपालन सुद्धा केली जाते. पशुपालन केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदत होते आणि शेती मध्ये सुद्धा खूप फायदा होतो.

पशुपालन मध्ये शेतकरी गाय, बैल, बकरी, कोंबडी असल्या पशू चे पालन करत असतात. गाय पासून जे दूध मिळते त्याला विकून ते पैसे कमावतात. तसेच बकरी पासून दूध आणि कोंबडी पासून अंडे मिळते त्यांना सुद्धा ते विकतात.

गाय आणि बैलं पासून जे शेण मिळते त्या शेणाचा वापर खत बनवून केला जातो. तर बैलांचा वापर शेतात हल चालण्यासाठी केला जातो. आजच्या या आधुनिक युगात बैलाचा वापर कमी झालेला आहे कारण आज बैलांची जागा ही ट्रॅक्टर सारख्या मशीनेनी घेतली आहे.

गावातील जीवन हे खूप शांत असते. गावामध्ये शहरासारखी लोकांची आणि वाहतुकीचे गर्दी नसते. या कारणाने गावातील वातावरण हे प्रदूषण मुक्त असते. गावातील हवा ही फुलांच्या सुगंधाने भरलेली असते. गावातील लोक सकाळी लवकर उठतात आणि आपल्या कामाला लागतात तर रात्री लवकर झोपतात.

गावांमध्ये सण साजरे मोठ्या उत्साहाने साजरे केले जाते आणि यात्रा खूप मोठ्या प्रमाणात भरते. गावांमधील यात्रा बघण्याकरिता दुरून लोक येतात. गावा मधली यात्रा मध्ये लहान मुलांचे झुले आणि खेळणे सुद्धा असतात. गावांतील यात्रा मध्ये अनेक वस्तूंची दुकाने आणि खानपान ची दुकाने असतात.

आज भारतातील प्रत्येक गावात आधुनिक सुविधा पोहोचत आहेत. गावांमध्ये आज शिक्षणापासून ते रुग्णालयापर्यंत ची सुविधा उपलब्ध झालेली आहे.

आज प्रत्येक गावामध्ये दूरध्वनी, टीव्ही, इंटरनेट, मोबाईल फोन सारख्या आधुनिक सुविधा पोहोचलेली आहेत. आज भारतातील शेतकरी शेती करिता आधुनिक यंत्राचा वापर करत आहे.

आज भारतातील गाव इतके प्रगत झाले आहेत की गावात सिमेंट चे रोड सुद्धा बनलेले आहेत. आज गावांमध्ये प्रत्येक घर हे पक्के घर बनलेले आहे. खूप कमी प्रमाण आहे जिथे आज कच्चे घर राहिले असतील. गावांमध्ये आज पिण्याच्या पाण्याची व वापरण्याच्या पाण्याची उत्तम सोय झालेली आहे.

आज भारतातील गाव खूप जोराने प्रगती करत आहेत. आज गावातील तरुणांना स्किल इंडिया योजनेचा फायदा होत आहे. गावातील तरुणांना आज रोजगार मिळतोय. आज गावातील प्रत्येक व्यक्ती शेतीवर अवलंबून नसून स्वतःचा छोटा-मोठा व्यवसाय करत आहे.

आज गावांमधील लोक जास्त जागरूक झाले आहेत. गावातील लहान मुलांना उचित शिक्षा मिळत आहे. आज गावातील लोक शहराचा रस्ता धरत आहेत आणि याचे कारण शेतीला पुरेपूर पाणी न मिळणे व पर्यावरणाच्या समस्यां आहेत.

हे आपले कर्तव्य आहे की आपण आपल्या पर्यावरणाला प्रदूषित होण्या पासून वाचवले पाहिजे आणि आपल्या शेतकरी मित्रांना मदत केली पाहिजे. जर शेतकरी नसला तर आपण जगू शकणार नाही.

कारण शेतकरीच हा असा अन्न दाता आहे ज्याच्या मुळे आपण पोट भरून जेवण करतो आणि आपली भूक भागवत असतो. आज पण भारतातील गाव भारताची संस्कृती व संपदा चे आधार स्तंभ आहेत.


मित्रांनो आजचा निबंध तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझे गाव या निबंधावर (My Village Essay In Marathi) तुमचे काय मत आहे ते सुद्धा तुम्ही मला कमेंट च्या माध्यमातून सांगायला विसरू नका.

Sharing is caring!

Leave a Comment