माझ्या शाळेत पहिला दिवस मराठी निबंध | My School First Day Essay In Marathi

आजचा निबंध आपण माझ्या शाळेतील पहिला दिवस (My School First Day Essay In Marathi) आवर लिहिणार आहोत. ह्या अगोदर आम्ही माझी शाळा या विषयावर निबंध लिहिले आहेत ते निबंध तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर करून बघू शकता.

आजचा हा निबंध आम्ही वर्ग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 च्या विद्यार्थ्यांकरिता लिहिलेला आहे. सोबतच हा निबंध लहान मुलांकरिता सुद्धा लिहिलेला आहे.


माझ्या शाळेत पहिला दिवस मराठी निबंध


जीवनात आपल्या सोबत पुष्कळ घटना घडतात. त्या घटना आपण वेळे नुसार विसरून जातो. परंतु काही घटना अशा असतात ज्या आपण कधीही विसरू शकत नाही. त्या घटना आपल्याला नेहमीच आठवत असतात.

तसाच एक दिवस असतो जो आपण विसरत नाही. तो असतो आपल्या शाळेत जाण्याचा पहिला दिवस. मला आज पण तो दिवस आठवतो. ज्या दिवशी मी नवीन शाळेत प्रवेश घेतला होता.

ही गोष्ट तीन वर्षा अगोदरची आहे. जेव्हा मी वर्ग चौथीची परीक्षा पास करून माझ्या वडिलांसोबत दुसऱ्या गावात स्थायी झालो होतो. कारण माझ्या वडिलांची बदली नवीन गावामध्ये झालेली होती.

माझ्या बाबांची बदली रायगड जिल्ह्यात झालेली होती. त्यानंतर मला नवीन शाळेत प्रवेश घ्यायचे होते. माझ्या वडिलांना माहिती झाले की रायगड मध्ये संत तुकाराम शाळा आहे. जितचे शिक्षण खूप छान आहे.

त्यानंतर माझ्या बाबांनी माझा प्रवेश या शाळेत करून दिला. नवीन शाळा आणि नवीन मित्र बनवण्यासाठी मी खूप उत्साहित होतो. परंतु मला नवीन शाळेत मध्ये प्रवेश घेण्याचा जितका आनंद होता तितकीच चिंता सुद्धा वाटत होती.

मनात एक शंका होती की नवीन जागेवर नवीन शाळेत वर्गमित्र कशी असणार आणि माझ्यासोबत ते कशी वागणूक करणार. जेव्हा मी पहिल्या दिवशी माझ्या शाळेत गेलो तेव्हा माझी ती शंका दूर झाली.

माझी ही नवीन शाळा माझं आदल्या शाळेपेक्षा जास्त मोठी होती. माझ्या या नवीन शाळेतील विद्यार्थी खूप शांत आणि चांगल्या स्वभावाचे होते.

शाळेच्या पहिल्या दिवशी माझे वडील माझ्यासोबत मला शाळेत सोडायला आले होते. माझ्या वडिलांनी माझ्या शाळेतील मुख्याध्यापक आणि माझ्या वर्ग शिक्षक व इतर शिक्षकांशी माझे परिचय करून दिले होते.

जेव्हा मी माझ्या वर्गात गेलो तेव्हा माझ्या वर्ग शिक्षकांनी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना माझे परिचय करून दिले. माझ्या वर्गातील सर्व विद्यार्थी माझ्याकडे उत्सुकतेने बघत होते.

जेव्हा शाळेची मधली बेल वाजली तेव्हा सर्व विद्यार्थी माझ्या कडे आले. त्यांनी माझा परिचय घेतला व त्यांनी स्वतःचा सुद्धा परिचय दिला.

नंतर मी माझ्या नवीन बनविलेल्या वर्ग मित्रांसोबत जेवायला बसलो. माझ्या वर्ग मित्रांनी माझ्याशी त्यांचा डब्बा वाटला. नंतर आम्ही आपला डब्बा ठेवून पुन्हा काही वेळ खेळलो. व मधली सुट्टी संपल्या नंतर पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली.

शाळेची सुट्टी झाल्यानंतर माझे वर्ग मित्र शाळेच्या मुख्य द्वारा पर्यंत सोबत आले. आजचा पहिला दिवस असल्यामुळे मला माझे वडील घ्यायला आले होते. शाळेत विद्यार्थी घेऊन येणे व परत घरी घेऊन जाण्याकरिता शाळेची बस होती.

त्या दिवशी मी माझ्या सर्व नवीन मित्रांशी विदा घेतली व बाबां सोबत घरी आलो. मला माझ्या नवीन शाळेत दाखला घेऊन खूप आनंद झाला. या शाळेतील शिक्षक व विद्यार्थी माझ्या आदल्या शाळे सारखेच छान होते.

मी आज पण या शाळेत शिकत आहे व या शाळेतील विद्यार्थी माझे चांगले मित्र बनले आहेत. मला अशी शाळा मिळाली व त्यातील शिक्षक व अशी मित्र मिळाले हे माझे सौभाग्य आहे.


तर मित्रानो आजचा हा निबंध तुह्माला आवडला असेल याची मला खात्री आहे. तुमच्या शाळेचा पहिला दिवस कसा होता ते मला सांगायला विसरू नका. आजचा हा माझ्या शाळेत पहिला दिवस निबंध (My School First Day Essay In Marathi) तुह्मी आपल्या मित्रांशी share करू शकता.

Sharing is caring!

Leave a Comment