माझी शाळा निबंध | My School Essay In Marathi

आज आपला निबंधाचा विषय आहे माझी शाळा ( my school ). मित्रांनो आपण सर्व लहानपणी शाळेत जातो आणि ज्ञान प्राप्त करतो. तेव्हा सोबतच आपल्याला आपल्या शाळेच्या काही अश्या आठवणी मिळतात जे आपण कधीच विसरू शकत नाही. आणि आज आपण त्याच आठवणींना माझी शाळा वर निबंध (My school essay in Marathi) लिहून ताजी करूया.

आजचा निबंध हा वर्ग १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९, १०, ११, १२ च्या विद्यार्थी करिता खूप फायदेशील राहणार.


माझी शाळा निबंध – १ | My School Essay In Marathi


शाळेचे महत्व ( Importance of School )

शाळा आपल्या जीवनात खूप महत्त्वाची भूमिका निभावते. शाळेतून आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला मिळते. जर तुम्हाला शाळेत जाणे आवडत नसेल तर त्यात काही आश्चर्याची गोष्ट नाही. आपण सर्वांना शाळा खूप कमी आवडते.

शाळा ही एक विद्या मंदिर आहे जिथे ज्ञान चा भंडार असतो. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमधून काही विद्यार्थी जास्त ज्ञान घेऊ शकतात तर काही कमी. शाळेमधून आपण त्या गोष्टी शिकू शकतो जे आपण बाहेर कुठे शिकू शकत नाही.

कारण बिना ज्ञान शिवाय आपण आपल्या जीवनात चांगल्या व खराब वेळेस बरोबर निर्णय घेऊ शकत नाही आणि याच कारणामुळे सर्वांना शिक्षणाचा महत्त्व समजायला पाहिजे. शाळेमध्ये गेल्याने मुलांमध्ये ते गुण निर्माण होतात जे त्यांना त्यांचा भविष्य बनवण्यात मदत करतात.

ज्या मधल पहिलं गुण आहे जिज्ञासा. जेव्हा एखादा मुलगा शाळेत जातो तेव्हा त्याला अशा काही गोष्टी माहीत होतात ज्या मध्ये त्यांची रुची वाढते. तीच जिज्ञासा त्याला ज्ञान प्राप्त करण्यास मदत करते.

शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची विचार करण्याची व समस्या वर निदान शोधण्याची क्षमता वाढते. जी त्यांना भविष्यात येणाऱ्या अडचणी सोबत लढण्यास मदत करते. शाळे मध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रम मुळे आपल्याला भविष्यात होणारे नेता मिळतात जे आपल्या भारताचे नेतृत्व करू शकतात व भारताला समोर घेऊन जाऊ शकतात.

तसे पाहिले तर शाळेत जाण्याची पुष्कळ काही फायदे आहेत ज्यामध्ये समाविष्ट आहे चांगला आणि प्रभावी मौखिक आणि लिखित संप्रेक्षण, माहितीचे अचूक विश्लेषण करणे इत्यादी.
ही तर झाली गोष्ट शाळेच्या महत्त्वाची आता मी माझ्या शाळेबद्दल सांगतो.

माझी शाळा

माझे नाव राहुल आहे आणि मी महाराष्ट्रात राहतो. माझी शाळा माझ्या घरापासून दोन किलोमीटर च्या अंतरावर आहे. मी माझ्या शाळेत सकाळी दहा वाजता जातो. मला माझ्या शाळे मध्ये घेऊन जाण्या करिता स्कूल बस येते ज्यामध्ये आणखी काही शाळेत जाणारे विद्यार्थी असतात.

माझ्या स्कूल बसचे ड्रायव्हर काका खूप छान आहेत. जर मला कधी वेळ झाला तर ते माझ्यासाठी आमच्या घरासमोर स्कूल बस थांबवतात. जर मला कधी खूपच वेळ झाला तर माझे बाबा मला शाळेत सोडून देतात.

माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद रायपुर. ही एक सरकारी शाळा आहे. माझ्या शाळेत वर्ग एक ते वर्ग दहा पर्यंत शिकवले जाते. माझ्या शाळेत पूर्ण मिळवून ३० शिक्षक आणि दहा कार्यकर्ता असतात. माझ्या शाळेत कम्प्युटर कक्षा सुद्धा आहे. जिथे आम्हाला कम्प्युटर शिकवण्यात येते.

माझ्या शाळे मध्ये खेळायला खूप मोठा मैदान आहे जिथे आम्ही सर्व मित्र मिळून वेगवेगळे खेळ खेळतो. मी जेव्हा माझ्या शाळेत पहिल्यांदा जातो तेव्हा आम्ही सर्व शाळेच्या मैदानात एकत्र होऊन राष्ट्रगीत म्हणतो.

राष्ट्रगीत म्हणून झाल्यानंतर आम्ही सर्व आपल्या वर्गामध्ये जाऊन बसतो. पहिला विषय आम्हाला आमचे वर्ग शिक्षक शिकवतात. शिकवण्याचा अगोदर ते सर्व मुलांची उपस्थिती घेतात.

माझ्या शाळेत आम्हाला दोन वाजता एक तासाची सुट्टी दिली जाते. ज्या सुट्टी मध्ये आम्ही जेवण करतो. आमच्या शाळे मध्ये दररोज सर्वांना जेवण दिले जाते जेणेकरून कोणतापण विद्यार्थी उपाशी राहू नये.

जेवण झाल्यानंतर आम्ही सर्व विद्यार्थी आमचे मित्रां बरोबर खूप खेळ खेळतो. आणि मग पुन्हा शाळेत अभ्यास करायला सुरुवात करतो. आणि शेवटी संध्याकाळी पाच वाजता आम्हाला शाळेतून सुट्टी होते. ती झाल्यानंतर आम्ही सर्वे प्रार्थना करतो आणि स्कूल बस मध्ये घरी परत जातो.

मला माझी शाळा खूप आवडते. आपण सर्वांना शाळेत जाऊन ज्ञान प्राप्त करायला हवे आणि आपल्या आई वडिलांचे नाव उच्च करायला हवे.


माझी शाळा निबंध – २ | Essay On My School In Marathi


माझ्या शाळेचे नाव संत शिवराम आहे. माझी शाळा खुप सुंदर आहे. माझी शाळा माझ्या घरापासून थोड्या अंतरावर आहे. माझ्या शाळे मध्ये वर्ग 1 पासून ते वर्ग दहा पर्यंत शिकवले जाते.

माझ्या शाळेची इमारत तीन मजली आहे. माझ्या शाळेतल्या वर्गांचे पंखे, फर्निचर आणि बाकी सर्व छान आहे. माझ्या शाळेत शिक्षणाची उत्तम व्यवस्था आणि इतर शैक्षणिक उपक्रमांची उत्कृष्ट व्यवस्था केली आहे.

माझ्या शाळेचे वातावरण खूप शांत आणि अभ्यास करण्यासाठी बरोबर आहे. माझ्या शाळे मध्ये एकूण आठशे विद्यार्थी असतात. माझ्या शाळेतील विद्यार्थी नियमित शाळेत येतात. माझ्या शाळेची वेळ सकाळी 11 वाजता पासून ते संध्याकाळी पाच वाजता पर्यंत असते.

माझ्या शाळेत पुष्कळ विद्यार्थी आजूबाजूच्या गावांमधून येतात. आणि त्यांच्या करिता त्यांना शाळेत आणणे आणि वापस घरी नेण्याकरिता शाळेकडून स्कुल बसची व्यवस्था सुद्धा केली आहे.

आमच्या शाळे मधले सर्व विद्यार्थी शिक्षकांबद्दल खूप आदर भाव ठेवतात. माझ्या शाळेतील शिक्षक कधीच कोणत्या विद्यार्थी वर् रागवत नाही. आणि जरी कधी रागावले तर् तें आमच्या चांगल्या करताच असते.

आमच्या शाळेतील सर्व शिक्षक आम्हाला शिकवण्या बद्दल खूप उत्साही आहेत. आमचे शाळे समोर एक मोठे मैदान आहे. या मैदानात आम्ही रोज नवीन नवीन खेळ खेळतो. सोबतच आमचे शिक्षक आम्हाला नवीन नवीन खेळ शिकवतात.

यामुळे आम्हाला नवीन खेळ खेळण्यांचा आनंद प्राप्त होतो आणि सोबतच त्या नवीन खेळाबद्दल माहिती सुद्धा मिळते. आम्ही आमच्या शाळेत कब्बडी खो-खो क्रिकेट इत्यादी प्रकारचे खेळ खेळतो.

माझ्या शाळे मध्ये गरीब विद्यार्थ्याना मोफत शाळेची पोशाख दिली जाते. माझ्या शाळे मध्ये प्रजासत्ताक दिवस व स्वतंत्रता दिवस वर् विविध कार्यक्रम चे आयोजन केले जाते. या दिवशी शाळेत निबंध लेखन आणि देशभक्ती वर् गाण्यांचे आयोजन केले जाते.

आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्याना नवीन नवीन उपक्रमात सहभागी होण्याची संधी दिली जाते. आजच्या काळात तकनीकी शिक्षणाचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे आमच्या शाळेत तकनीकी शिक्षणावर जास्त जोर दिला जातो. आणि आम्हाला संगणक चे प्रशिक्षण दिले जाते.

यामुळे त्या गरीब मुलांना सुद्धा कम्प्युटरचे ज्ञान मिळते जे कम्प्युटर विकत घेऊ शकत नाही. आमच्या शाळेत आम्हाला मोठ्यांचा सन्मान करणे, गरीबांची मदत करणे आणि भुकेलेल्यांना जेवण देणे असे अमूल्य विचार शिकवले जाते.

झाडे लावा झाडे जगवा, मुली वाचवा मुली शिकवा अश्या जनजागृती चे कार्यक्रम सुद्धा माझ्या शाळेत आयोजित केले जाते. माझी शाळा ही एक आदर्श आणि सुंदर शाळा आहे. एक चांगली शाळा आणि एक चांगला शिक्षक विद्यार्थी ला एक चांगला नागरिक बनवतो.


माझी शाळा निबंध – ३ | Short Essay On My School In Marathi


माझ्या शाळेचे नाव श्री स्वामी विवेकानंद विद्यामंदिर आहे. माझी शाळा एक आदर्श शाळा आहे. माझ्या शाळेत शिक्षा, क्रीडा आणि अन्य शैक्षणिक उपक्रमांची चांगली व्यवस्था केलेली आहे.

माझ्या शाळेचे वातावरण खूप शांत आणि तसेच आहे जशी एका शाळेच्या वातावरणाला असायला पाहिजे. माझ्या शाळे मध्ये वर्ग पहिली ते वर्ग दहावी पर्यंत ची शिक्षा दिली जाते. माझ्या शाळेची इमारत चार मजली आहे आणि त्यात सुमारे 80 खोल्या आहेत.

आमच्या शाळेतील सर्व वर्गामध्ये चांगले पंखे आणि फर्निचर लावलेले आहेत. याशिवाय स्टाफ रूम, पुस्तकालय, हॉल, कम्प्युटर खोली, परीक्षा खोली येथे चांगली व्यवस्था केली आहे. माझ्या शाळेत पिण्याचे पाणी आणि शौचालय चे पण चांगली व्यवस्था केलेली आहे.

माझ्या शाळेत एकूण हजार विद्यार्थी शिकतात. माझ्या शाळेत पूर्ण मिळून पन्नास शिक्षक आहेत. आणि त्याच बरोबर माझ्या शाळेत पंधरा अतिरिक्त कर्मचारी सुद्धा आहेत. यामध्ये तीन क्लर्क आणि पाच चपरासी आहे.

शिक्षणाच्या बाबतीत माझी शाळा माझ्या गावात सर्वोत्तम आहे. माझ्या शाळेतून सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास होतात. आणि आमचे शिक्षक आम्हाला चांगले मार्गदर्शन करतात.
जसे मी तुम्हाला सांगितले होते की आमच्या शाळेत कम्प्युटर खोली सुद्धा आहे. या खोलीमध्ये आम्हाला रोज कम्प्युटर शिकवले जाते.

आमच्या शाळे मध्ये अभ्यासा सोबतच खेळाला सुद्धा महत्त्व दिले जाते. आमचे शिक्षक आम्हाला नवीन नवीन खेळ शिकवतात. जसे क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, बॅडमिंटन, खोखो, कबड्डी. आणि सोबतच या खेळांना खेळण्याची बरोबर माहिती सुद्धा देतात.

माझ्या शाळेत एक खूप मोठा पुस्तकालय आहे ज्यामध्ये सर्व विषयांची पुस्तके मिळतात. या पुस्तकालय मध्ये पाठ्यपुस्तकांत सोबत गोष्टी, कविता आणि ज्ञान-विज्ञान च्या संबंधित पुस्तके सुद्धा मिळतात.

माझ्या शाळेच्या मैदानात पुष्कळ झाडे लावले गेले आहे. आमच्या शाळेत आम्हाला आमचे शिक्षक सांगतात की झाडे आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे आणि का बर आपल्याला झाडे लावायला हवी. आम्ही आमच्या शाळेतील सर्व झाडांची पूर्ण देखरेख करतो.

आमच्या शाळे मध्ये प्रत्येक वर्षी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जातो. माझ्या शाळेतील सर्व विद्यार्थी या सांस्कृतिक कार्यक्रमात खूप उत्साहाने भाग घेतात.

माझी शाळा माझ्यासाठी एक वरदान आहे. जिथे मला इतके छान शिक्षक आणि कार्यकर्ते मिळाले. ज्यांच्यामुळे मला चांगले शिक्षण मिळते. मला माझ्या शाळेवर खूप गर्व आहे.


जर तुम्हाला माझी शाळा निबंध ( my school essay in marathi ) आवडला असेल तर तुम्ही हा निबंध आपल्या मित्रांसोबत आणि भाऊ बहिणी सोबत शेअर करू शकता. आणि तुम्ही तुमच्या शाळेबद्दल निबंध लिहून आम्हाला पाठवू शकता.

Sharing is caring!

Leave a Comment