माझी आई मराठी निबंध | My Mother Essay In Marathi

मित्रांनो आज आपण माझी आई मराठी निबंध (my mother essay in marathi) लिहिलेला आहे. आईचे जीवन हे खूप अनमोल आणि समर्पण भावने जोडलेला असतो. आई ही प्रत्येकाच्या जीवनातील पहिली शिक्षक असते.

आज आपण class १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९, १०, ११, १२ च्या विद्यार्थ्यांसाठी माझी आई हा मराठी निबंध (my mother essay in marathi) लिहणारआहोत. तुम्ही हा निबंध तुमच्या शाळेत परीक्षे मध्ये किंवा कॉलेज प्रोजेक्टसाठी लिहू शकता.

आजच्या या लेख मध्ये आम्ही हजार शब्दांचा आणि 500 शब्दांचा निबंध लिहिलेला आहे. तुम्हाला लागेल तितके ओळी तुम्ही या निबंधातून लिहू शकता.


माझी आई मराठी निबंध | My Mother Essay In Marathi


आई या शब्दाची व्याख्या कोणतीही पेन, पेन्सिल करू शकत नाही. कारण आईला कोणत्याही शब्दांमध्ये स्पष्ट करता येत नाही. तरीपण आज मी आई बद्दल काही छान गोष्टी लिहिणार.

आई ही त्या पाण्या सारखी आहे जो नेहमी वाहत असतो आणि जगाला जीवन दान देत राहतो. आई ही अशी मजबूत पहाड आहे जी खराब वेळ असल्यावर सुद्धा मजबुतीने त्या वाईट वेळेचा सामना करते.

आई ही एकाद्या नदी सारखी आहे जि निरंतर निर्मल आणि धर्मदाय भाव सोबत वाहत राहते. आई एका तापत्या भूमी सारखी आहे जी स्वतः च्या सुखाचे बलिदान आपल्या मुलांच्या संगोपन साठी करते.

आई मध्ये पूर्ण ब्रह्मांड सामावले आहे कारण आई शिवाय इथे जीवनाची कल्पना सुद्धा करता येत नाही. आई ही देवाची सर्वात मोठी देण आहे. म्हणतात की देव सर्वांच्या जवळ राहू शकत नाही म्हणून त्याने आई बनवली.

आई ही सर्वांचे दुःख हरून टाकते आणि आपल्या कुटुंबात आनंद ठेवण्याचे काम हे आई करते. आई ही जीवनात कधी पण आपल्या मुलांचा साथ सोडत नाही. जरी तुम्ही तिच्याशी कसे पण वागले असाल, किती पण तिला त्रास दिला असेल तरीसुद्धा आई तिची मुलं नेहमी सुखात राहावी हीच प्रार्थना करत असते.

आई आपल्या जीवनात खूप महत्व ठेवते कारण जर ती नसली तर आपले जीवन तितके सोपे राहत नाही जितके आई असल्यावर असते.

आई ही एक देवदूत आहे कारण तिने आपल्याला जन्म दिला आणि आपल्याला जगात आणले. आई जेव्हा आपल्याला जन्म देते तेव्हा तिला असहनिय वेदना होते. तरीसुद्धा ती त्या सर्व वेदना सहन करून आपल्याला या जगात आणते आणि जीवन देते.

जन्म दिल्यावर आई चे काम इथे संपत नाही मुलांना जन्म दिल्यावर आई त्याचे लहानपणीपासून पालन-पोषण सुद्धा करते. ती आपल्या गरजा पूर्ण न करता आपल्या मुलांच्या गरजा पूर्ण करते. आई ही स्वतः उपाशी राहून आपल्या लेकरांचे पोट भरते त्याला उपाशी राहू देत नाही.

आई आपल्या मुलांसाठी खूप बलिदान देते. ती आपल्या मुलांना त्या सर्व सोयी देते जि ती देऊ शकते. आई ही आपली पहिली गुरु असते. तीच आपल्याला सर्वात अगोदर शिक्षण देते. आई आपल्याला आपल्या पायावर चालायला शिकवीते. आई ही आपले जीवन आपल्या मुलांना व कुटुंबाला समर्पित करत असते.

आई ही नेहमी आपले दुःख विसरून आपल्या कुटुंबाच्या सुखा बद्दल विचार करत राहते. आई आपल्याला लहानपणी खूप चांगल्या गोष्टी सांगत असते. ज्यामध्ये आपल्याला अशी शिक्षा मिळते जी आपल्याला आपल्या जीवनात एक चांगला व्यक्ती बनवण्यास खूप मदत करत असते.

आईच्या सांगितलेल्या गोष्टी मधून जे आपल्याला शिकायला मिळते त्यांनी आपले जीवन आणखी सुलभ होते. आई आपल्याला जीवन जगण्याचा चांगला मार्ग दाखवते. आई आपल्याला जगातील वाईट गोष्टींशी लढण्याची शिक्षा देते.

आपण जेव्हापण आनंदी होतो तेव्हा आपली आई सुद्धा आनंदी होते. आईसारखी निर्भय कोणी पण राहू शकत नाही कारण जेव्हा तिच्या कुटुंबावर कोणतेही संकट येते तेव्हा ती सर्व संकटाशी स्वतः निर्भय होऊन सामना करते.

आईच्या मनात आपल्याबद्दल नेहमी दया भावना असते. आपल्याला ती काहीही मागत नाही पण आपल्या पूर्ण गरजा ती पूर्ण करते. आई आपल्याला समाजात कसे  चलायचे आणि कसे वागायचे याची शिक्षा पण देते. आई आपल्याला चांगल्या आणि वाईट मध्ये फरक करणे शिकवते.

आई आपल्याला दुसऱ्यांचा जे आपल्यापेक्षा मोठे आहेत आणि आपल्यापेक्षा लहान आहेत त्यांचा आदर करणे सुद्धा शिकवते. आई आपल्याला निरंतर आपल्या चांगल्या भविष्याकडे जाण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन देत असते.

आई जीवनभर आपली सेवा करते. जेव्हा केव्हा आपल्याला दुखापत होते किंवा आपण आजारी पडतो तेव्हा आई सर्वात जास्त आपल्यासाठी चिंतीत असते. ती रात्र दिवस आपली सेवा करते आणि आपल्याला आजारातून बाहेर काढते.

ती देवाला आपल्या चांगल्या आयुष्याची आणि आरोग्याची प्रार्थना करत असते. आई ही नेहमी आपल्या कुटुंबासाठी देवाला मागत असते. ती स्वतःसाठी काही मागत नाही. त्यामुळे हे आपले कर्तव्य आहे की आपण आपल्या आईला नेहमी आनंदी ठेवावे आणि तिची चांगल्याने देखरेख करावी. कारण तिच्यासाठी आपण आहोत आणि आपल्यासाठी ती आहे.

आपण जीवनात कितीही मोठे झालो तरी आपल्या आईसाठी आपण लहान असतो. जीवनात आपल्याला कधीही कोणताही त्रास झाला तर आपल्यासाठी धावून कोणी येईल याची खात्री नाही परंतु आई नक्की आपल्या करीता धावून येईल याची खात्री देऊ शकतो.

आई नेहमी आपल्याला कठीण परिस्थिती सोबत लढायला शिकवते आणि जेव्हा आपण आपल्या जीवनात निराश होतो तेव्हा आई आशेची किरण बनून आपल्याला मार्ग दाखवते.

आई आपल्या जीवनात आपल्याला यश मिळाल्यानंतर सुद्धा आपल्या सोबत असते. आईचा आशीर्वाद तिच्या मुलांसोबत नेहमी असतो आणि तोच तिचा आशीर्वाद आपल्याला जीवनात नेहमी साथ देत असतो.

आई आपल्याला नेहमी हिम्मतवार, धैर्यवान आणि चांगला व्यक्ती बनवत असते. आई आपल्याला समाजात आपली ओळख बनवण्यास मदत करते. ती आपल्याला नेहमी यशाच्या उंच शिखरावर बघण्यासाठी प्रयत्न करत असते.

आई ही एक असे धन आहे ज्याला देव प्रत्येक मनुष्याला देतो आणि आई हि ज्याच्याकडे असते त्याचे जीवन हे स्वर्गात असते. कारण आई या धरतीवर आपल्या मुलांन करिता आणि कुटुंबासाठी स्वर्ग बनवते.

आईचे प्रेम घेण्यासाठी देव सुद्धा पृथ्वीवर जन्म घेतो. आईचे प्रेम कशे असते त्याला अनुभवासाठी देवाला सुद्धा पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो. याचा एक चांगला उदाहरण आहे भगवान श्रीकृष्ण. श्री कृष्ण यांनी आईचे प्रेम प्राप्त करण्याकरिता आणि आईची ममता अनुभव करण्यासाठी पृथ्वीवर जन्म घेतलेला होता.

आई आपल्या आणि आपल्या कुटुंबासाठी तिचे पूर्ण जीवन समर्पित करून टाकते. पण आपण तिला दोन वेळेस जेवायला पण देत नाही. ही एक दुखत गोष्ट आहे की ज्या आईने आपल्याला जीवन दिले, आपल्याला पोसले आणि मोठे बनवले, जीवनात यशस्वी केले तिला आपण दोन वेळाच जेवण सुद्धा देऊ शकत नाही.

जेव्हा आपण आपल्या पायावर उभे होतो आणि जीवनात यश प्राप्त करतो तेव्हा आपले काही कर्तव्य आपल्या आई साठी असतात जे आपल्याला पूर्ण करायला पाहिजे.

आपल्याला आपल्या आईच्या सर्व गरजा पूर्ण करायला पाहिजे. आपल्याला त्यांच्या म्हातार पणी त्यांची सेवा केली पाहिजे. आणि आपल्या आई-वडिलांचे बलिदान कधीही विसरले नाही पाहिजे. व त्यांना तितकेच प्रेम दिले पाहिजे जितके त्यांनी आपल्याला लहानपणापासून दिलेले आहे.

आपल्याला आपल्या कामातून वेळ काढून आपल्या आई-वडिलांशी संवाद साधला पाहिजे त्यांना त्यांच्या गरजा आणि हालचाल विचारला पाहिजे. आपल्याला आपल्या आई-वडिलांचा आशीर्वाद नेहमी घेत राहायला पाहिजे. कारण आई-वडिलांच्या आशीर्वादा पेक्षा मोठे धान कोणतेही नाही.

आईला तिच्या मुलांकडून पैसा, मकान हे काही नको असते. फक्त तिला तिच्या मुलांकडून प्रेम आणि त्यांचे सुखी जीवन हेच हवे असते. म्हणून आपल्याला आपल्या आई-वडिलांना नेहमी आनंदी ठेवले पाहिजे व त्यांची नेहमी सेवा केली पाहिजे.

आई सारखी बलिदान देणारी, साहस दाखवणारी व आपल्या कुटुंबात आनंद पसरवणारी दुसरी कोणीच नाही. आई ही देवाचा दुसरा स्वरूप आहे जिला देवाने त्याच्या जागेवर पाठवले आहे.


Short Essay On My Mother In Marathi


माझी आई खुप सुंदर आहे. तिचे केस लांब आणि डोळे हिरणीसारखे आहे. माझी आई दिसायला बारीक पण स्वस्थ आहे. माझ्या आईची वय 36 वर्षे आहे. ती नेहमी कामात व्यस्त असते.

मी माझ्या परीने माझ्या आईला कामा मध्ये मदत करत असतो. माझी आई घरातील सर्व कामे स्वतः करते. माझी आहे सकाळी उठल्यानंतर सर्वात अगोदर घराची साफसफाई करते. नंतर ती जेवणाची तयारी सुद्धा करते.

माझी आई आम्हाला दररोज वेगवेगळे पदार्थ बनवून खायला देते. माझी आई आमचे कपडे धुऊन त्यांना प्रेस करून आम्हाला घालायला देते. माझी आई मी शाळेतून आल्यानंतर रोज माझ्या बरोबर नवीन खेळ खेळते आणि रामायण, महाभारत आणखी काही मजेदार गोष्टी आम्हाला सांगते.

माझ्या आई ची विचार करण्याची क्षमता खूप चांगली आहे. माझी आई माझ्या बाबांच्या पगाराच्या वतीने घर खर्च बरोबर चालवते. माझी आई सकाळी सर्वांच्या अगोदर उठते आणि सर्व झोपल्यावर ती रात्री झोपत असते.

माझ्या आईला गाणे ऐकायला खूप आवडते. माझी आई संगीत या विषयात चांगली माहिती ठेवते. माझी आई स्वतः सुद्धा खूप छान गाणं म्हणत असते. माझ्या आईला भजन आणि गाणी म्हणणे खूप आवडते. ती दर रोज देवाची पूजा करते आणि तुळशीला पाणी देते.

माझी आई घरातील सर्व काम लवकर आणि चांगल्याने करते. माझी आई नेहमी आनंदी राहत असते. माझी आई माझी आणि माझ्या कुटुंबाच्या स्वस्थ ची देखभाल चांगल्या ने करत असते.

माझ्या आईला लहान-मोठ्या आजारांसाठी घरगुती नुसके माहिती आहेत ज्यामुळे आम्हाला डॉक्टर कडे कवी जावे लागते. माझी आई शिक्षणाने बी. ए. पास झालेली आहे. माझी आई आमच्या अभ्यासात आमची मदत करते.

ती दररोज आम्हाला नवीन गोष्टी शिकवत असते. माझी आई आमच्या शाळेत येऊन माझ्या शिक्षकांशी भेटत असते आणि आमच्या प्रगती बद्दल माहिती ती शिक्षकांकडून घेत असते.

आमची आई आम्हाला आनंदी पाहून ऊन खूप आनंदी होत असते. तिच्या डोळ्यात आमच्याबद्दल नेहमी प्रेम दिसत असतो. माझी आई आमचे पालन-पोषण करण्याबरोबरच आमच्या कडून झालेल्या चुकांना ती माफ करते.

एका युरोपीय ने म्हटले होते की “देवाच्या अस्तित्वावर मला विश्वास नाही, पण जेव्हा मी एखाद्या आईला बघतो तर विचार करतो की जर देव खरोखर असेल तर तो बिलकुल आई सारखा असणार”.

ह्या गोष्टीमध्ये त्यांनी आईच्या बलिदान आणि निस्वार्थ प्रेमाला दर्शविले आहे. प्रत्येक मुलाला त्याची आई ही सुंदर असते आणि प्रत्येक आईसाठी तिचा मुलगा हा सुंदर असतो. माझ्या आईला वेगवेगळ्या सुंदर साड्यांचा छंद आहे. माझ्या आईकडे एकूण ३५ साड्या आहेत.

कोणत्या वेळेस कोणती साडी घालायला हवी हे तिला चांगले माहीत असते. माझी आई प्रत्येक सणाला साजरी करते व देवाची पूजा पाठ करत असते. सणांच्या दिवशी माझी आई वेगवेगळे छान जेवण आमच्यासाठी बनवत असते.

आमची आई होळी, दिवाळी, दसरा, जन्माष्टमी सारख्या सर्व सणांवर विधी विधान पूर्ण पूजा करत असते. माझी आई माझ्या वडिलांचा खूप आदर करते. पण माझ्या आईला माझ्या वडिलांचे मध्यपान करणे अजिबात आवडत नाही.

ह्या गोष्टीवर आई आणि बाबाचे कधीकधी वादावाद होत असते. आता माझ्या वडिलांनी मध्यपान करणे कायमचे सोडलेले आहे. कारण मद्यपान करणे हे आपल्या शरीरासाठी चांगले नसते.

माझी आई आमच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचा आणि माझ्या मित्र मैत्रिणींचा आदर भावाने स्वागत करते. माझ्या आईचे म्हणणे असते की घरी आलेला पाहुणा हा देवाचा रूप आहे. मी असे समजतो की माझ्या घराला सुखाने चालवण्याचा मागे माझ्या आईचा खूप मोठा हात आहे आणि मला माझ्या आईवर खूप गर्व आहे.


तर मित्रांनो हा होता माझी आई या विषयावर मराठी निबंध (my mother essay in marathi). तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट च्या माध्यमातून सांगू शकता. जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर तुम्ही सोशल मीडिया वर याला शेअर करू शकता.

Sharing is caring!

Leave a Comment