माझे गाव मराठी निबंध | Maze Gaon Essay In Marathi

मित्रांनो आज आपण माझे गाव विषयावर मराठी निबंध (Maze Gaon Essay In Marathi) लीहणार आहोत. मित्रांनो आजचा हा निबंध मी वर्ग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 च्या विद्यार्थ्यांकरिता आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांकरीता लिहिलेला आहे. आज आपण जो निबंध लिहिणार आहोत तो आठशे शब्दांपर्यंत लांब आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार निबंध लिहू शकता.


माझे गाव मराठी निबंध | Maze Gaon Essay In Marathi


भारताला कृषि प्रधान देश म्हटले जाते याचे कारणं अनेक आहेत. भारतात शहरां पेक्षा गावाची जास्त संख्या आहे. भारताला कृषि प्रधान देश म्हटले जाते कारण भारतात शेतकरी राहतात आणि मोठ्या प्रमाणात भारतात शेती केली जाते.

भारतातील गावाचे जीवन खूप सोपी आणि साधी आहे. आज सुद्धा गावात आधुनिक सोयी आणि सुविधा नाही आहेत. गावात राहणारे लोक आज पण शेती जुन्या पद्धतीने करतात.

माझ्या गावात वेगवेगळे पिकांची शेती केली जाते. माझे गाव हे महाराष्ट्र राज्य मध्ये वर्धा जिल्ह्यात आहे. माझ्या गावाचे नाव तळेगाव आहे. माझे गाव हे वर्धा जिल्ह्यापासून 45 किलोमीटरवर च्या दूरी वर आहे.

माझ्या गावाच्या जवळपास आणखी काही गाव आहेत. माझ्या गावामध्ये कोणतीही आधुनिक सुविधा नसल्यामुळे आम्हाला दुसऱ्या गावामध्ये जावे लागते.  आमच्या गावामध्ये वर्ग ५ पर्यंत शाळेत शिकावंले जाते.

इथे शिकवणारे शिक्षक आम्हाला नवीन गोष्टी सांगतात. ते आम्हाला निर निराळी खेळांची माहिती सुद्धा देतात. भारतातील गाव हे भारताच्या आर्थिक विकासात सुद्धा खूप महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात.

कारण भारतात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते ज्यामुळे भारतातून बाहेर देशात मोठ्या प्रमाणात फळांची व पिकांची निर्यात केली जाते. ज्यामुळे शेती आणि गाव हे भारताच्या आर्थिक विकतात खूप मोठे योगदान देतात.

माझ्या गावात विकास करण्याकरिता सरकारने खूप मोहीम राबवले आहेत. तरीपण अजूनही काही भागात त्या योजना लोकांपर्यंत पोहोचायचे आहेत. त्यामुळे अजूनही आमच्या गावांमध्ये पूर्ण विकास व्हायचा आहे. जेणेकरून गावकऱ्यांना आधुनिक सुविधा मिळतील.

आधी माझ्या गावात पक्की रोड नव्हते, लाईट नव्हती. पण आज आमच्या गावात पक्की रोड बनवल्या गेली आहे. सोबतच लाईट ची सुविधा सुद्धा आम्हाला मिळाली आहे.

दोन वर्षा अगोदर जेव्हा आमच्या गावात पक्की रोड नव्हते तेव्हा आम्हाला खूप त्रास व्हायचा. पक्की रोड नसल्याने आम्हाला पावसाळ्यामध्ये वाहने नेण्यास खूप त्रास होत होता.

तसेच जेव्हा आमच्या गावात वीज नसायची तेव्हा आम्हाला मोंबत्ती लावून त्यात अभ्यास करावा लागे. पण जेव्हापासून आमच्या गावात वीज आली आहे तेव्हापासून आम्हाला रात्रीचा अभ्यास करन्यासाठी खूप फायदा मिळालेला आहे.

माझ्या गावात उच्च शिक्षण नसल्यामुळे आमच्या गावातील मोठी मुले बाहेर गावी शिकायला जातात. त्यांना शिकण्याकरिता जो खर्च येतो. तो खर्च त्या मुलांचे आई-वडील दिवस रात्र शेती करून त्यांना पाठवतात.

आमच्या गावातील सर्वांना त्यांच्यावर विश्वास आहे की ते शहरात जाऊन खूप शिकून चांगल्या पदावर नोकरी करून गावाला मदत करतील. आमच्या गावा जवळ एक नदी आहे जी माझ्या गावापासून एक किलो मीटर अंतरावर असते.

सर्व शेतांमध्ये पाण्याची सोय केलेली आहे. आमच्या गावातील शेतामध्ये पिकांना पाणी देण्याकरिता विहीर बनविल्या आहेत. या विहिरींच्या पाण्याचा वापर शेतात पिकाला देण्याकरिता केला जातो.

माझ्या गावात शेती शिवाय पशूपालन केले जाते. माझ्या गावातील काही लोक शेती न करता गाय बकरी कोंबड्या इत्यादी प्राण्यांचे पालन करून स्वतःची पोट भरतात. याच्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे शेती नसणे किंवा शेती करण्यासाठी पैसे नसणे.

गावा मधील काही लोक गाय चे दूध विकून, कोंबडीचे अंडे विकून आपले जीवन चालवतात. तर काही शेती करून आपले पोट भरतात.

गावातील रोड चांगले झाल्याने आता गावातील लोक आजू बाजू च्या गावात जाऊन फळ भाज्या विकू शकतात. चांगले रोड असल्याने आज शहरातील लोक आमच्या गावा मधे फिरायला येतात. कारण आमच्या गावा मधे स्वच्छता राखली आहे.

जशी शहरात कोर्ट असतात. त्याच प्रमाणे माझ्या गावा मधे पंचायत समिती नेमली आहे. ही पंचायत समिती गावा मधील वाद विवाद आणि गावा मधील अन्य कामे बघतात.

गावामध्ये उच्च शिक्षण नसल्याने आम्हाला गावा बाहेर जावे लागते. २ वर्षा अगोदर जेव्हा चांगले रोड नव्हते तेव्हा आम्हाला शाळेत जाण्यास खूप त्रास होत होता. पण आज आमच्या गावा मधे ऑटो आणि रिक्षा ची सुविधा सुरू झाली आहे.

त्यामुळे आमच्या गावतील लोकांना खूप लाभ झाले आहेत. काही दिवसा अगोदर आमच्या गावातील सरपंच यांनी सांगितले की लवकरच आमच्या गावा मधे उच्च शिक्षण घेण्या करिता शाळा बनविण्यात येणार आहेत.

आमच्या गावाच्या मागे मोठ्या पहाड आहेत. जिथे पावसाळ्याच्या दिवसात खूप पाणी पडतो. पाणी पडल्याने गावाला तर फायदा होत असतोच. पण पहाडावर झाडे आणि पशूंना पण त्याचा फायदा होतो.

आमच्या गावामध्ये पोस्ट द्वारे कुरिअर (courier) आणि पत्र सुद्धा येतात. आमच्या गावा मध्ये काही घरी दूरध्वनी ची सोय आहे. ज्यामुळे आम्हाला कधीही काम पडले तर आम्ही दूरध्वनीचे वापर करत असतो.

आमच्या गावातील सर्व लोक खूप चांगले आणि साधे आहेत. आमच्या गावात सर्व मिळून मिसळून राहतात. जेव्हापण एखाद्यावर कोणतेही संकट आले तर सर्व गावकरी त्याच्या मदतीला नेहमी हजर असतात.

गावातील लोकांचे जीवन खूप साधे आहे. गावातील लोक सकाळी लवकर उठतात आणि आप आपल्या कामी लागतात. त्यांचे जीवन सकाळी शेतात सुरू होते आणि दिवसभर कष्ट झाल्यानंतर, दोन भाकरी खाऊन पोटाची भूक शांत करून रात्री समाप्त होत असते.

आमच्या गावात सर्व धर्मांचे लोक राहतात. आमच्या गावात एकूण दोनशे लोकांचे कुटुंब राहतात. गावातील 80% लोकांचे घर आज पक्के घर आहे. सरकारी योजना मुळे आज आमच्या गावातील प्रत्येक व्यक्तीला घर आहे.

आमचे गाव हे पर्यटक स्थळ असल्यामुळे आमच्या गावात स्वच्छतेची विशेष दक्षता घेतली जाते. आमच्या गावा मध्ये अनेक सुविधां लागू करण्यात येत आहेत. आमच्या गावात उच्च शिक्षणासाठी शाळा आणि रुग्णालय, बँक बनवण्यात येत आहेत.

गावामध्ये शाळा, रुग्णालय, बँक बनल्याने आम्हाला गावाच्या बाहेर जाण्याची गरज राहणार नाही. आमच्या गावात प्रत्येक घरी शौचालय बनवले गेले आहे. त्यामुळे गावातील लोकांना बाहेर शौच करायला जावं लागत नाही. आणि परिसर स्वच्छ राहतो.

लवकरच आमच्या गावात सरकारी बस ची व्यवस्था सुद्धा करण्यात येणार आहे. जेणेकरून बाहेर गावात आणि शहरांमध्ये जाण्याकरिता लोकांना सुविधा मिळेल.

आमच्या गावाचा विकास खूप जोराने सुरू आहे. सध्या आमच्या गावात पाण्याच्या टंकी चे काम सुरू आहे. पाण्याची टंकी बनल्याने आमच्या गावात सर्वांच्या घरी नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल आणि लोकांना शुद्ध पाणी मिळेल.

मी आणि माझे मित्र आमच्या गावात कबड्डी खो-खो क्रिकेट यांसारखे खेळ खेळत असतो. आमच्या गावात प्रत्येक वर्षी निरनिराळ्या खेळांची स्पर्धा होते. ज्यामध्ये बाहेर गावातील खेळाडू सुद्धा भाग घ्यायला येतात.

तसेच आमच्या गावात सर्व सण एकत्र मिळून साजरी केली जाते. माझे गाव हे माझ्यासाठी स्वर्ग आहे आणि या स्वर्गाला स्वर्ग बनवून ठेवण्याचे काम मी नेहमी करेल.


तर मित्रानो कसा वाटलंय हा निबंध तुह्माला हे मला नक्की कळवा. आज आपण माझे गाव या विषयावर निबंध (Maze Gaon Essay In Marathi) लिहलेला आहे. जर तुह्माला आणखी कोणत्या विषयावर निबंध पाहिजे असेल ते तुह्मी मला कंमेंट किव्हा कॉन्टॅक्ट करून करवू शकता.

Sharing is caring!

Leave a Comment