माझी शाळा मराठी निबंध । My School Essay In Marathi

मित्रानो आपण आज माझी शाळा मराठी निबंध बघणार आहोत. आपण सर्व शाळेत जातो आपल्या पुष्कळ शाळेतील आठवणी असतात ज्या आपण कभीच विसरत नाही. आजच्या या निबंधात आपण त्या सर्व आठवणी आठवून आजचा निबंध लिहूया. मित्रानो आजचा हा निबंध मी माझ्या जीवनात शाळेत घडलेल्या गोष्टी च्या आधारित लिहत आहो.


माझी शाळा मराठी निबंध


माझी शाळा खुप सुंदर आहे आणि मला माझी शाळा खूप आवडते. माझी शाळा माझ्या घरापासुन दोन किलोमीटर अंतरावर आहे. माझी शाळा दोन किलोमीटर अंतरावर असल्यामुळे माझ्या शाळेतून दररोज स्कूल बस मला घ्यायला येते. माझी आई मला रोज स्कूल बस मधे बसून देते.

माझी शाळा गावापासून दूर एका एकांत स्थान वर आहे. जिथे कोणत्या पण प्रकारचा गोंधळ होत नाही. अभ्यास करण्या करिता शांत वातावरण असणे आवश्यक असते. कारण जर शाळे जवळचे वातावरण शांत नसले तर विद्यार्थ्यांचा अभ्यासात मन लागत नाही.

माझी शाळा हि खूप मोठ्या परिसरात बनवलेली आहे. माझी शाळा ही तीन मजली आहे ज्यामध्ये 60 खोल्या आहेत. माझ्या शाळेत दररोज स्वच्छता केली जाते माझ्या शाळेत रोज आमचे वर्ग खोल्या आणि प्रसाधनगृह साफ केले जाते.

आमच्या शाळेत स्वच्छता राखली जाते त्यामुळे आम्हाला अभ्यास करण्यास स्वच्छ परिसर मिळतो. माझ्या शाळेत वर्ग पाच ते वर्ग बारा पर्यंत शिकवले जाते. आणि मी वर्ग 6 मध्ये शिकतो. माझा वर्ग दुसऱ्या मजल्यावर आहे.

आमच्या शाळेत पिण्याचे पाण्याची चांगली व्यवस्था केली गेली आहे. आमच्या शाळेत पिण्याच्या पाण्याचे वॉटर कुलर लावलेले आहेत. ज्यामुळे आम्हाला उन्हाळ्यात थंड पाणी पिण्यासाठी मिळते. सोबतच वापर करण्याकरिता पाण्याची सोय सुद्धा केलेली आहे.

माझ्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींसाठी वेगवेगळे शौचालय बनवले आहे. आमच्या शाळेमध्ये एक भव्य पुस्तकालय आहे जिथे आम्ही दररोज गोष्टी ची पुस्तके आणि इतर पुस्तके वाचत असतो.

आजच्या युगात संगणक चे ज्ञान असणे खूप आवश्यक झालेले आहे त्याकरिता आमच्या शाळेत संगणकाचे शिक्षण दिले जाते. आमच्या शाळेत एकूण 4 संगणक कक्ष आहेत. जिथे आम्हाला संगणक शिक्षण दिले जाते. प्रत्येक खोली मध्ये एकूण 15 संगणक ठेवलेले आहेत.

आमचे संगणक शिक्षक आम्हाला दररोज संगणकाची नवीन नवीन माहिती देत असतात. आमच्या शाळेत शिक्षकांसाठी एक खोली आहे जिथे सर्व शिक्षक बसतात. सर्व शिक्षक त्या खोलीमध्ये बसून एकमेकां सोबत विचार विमर्श करत असतात.

आमच्या शाळेला आणखी एक भव्य खोली आहे जिथे आमच्या शाळेचे सर्व अधिकृत काम केले जाते. सोबतच आमच्या शाळेचे मुख्याध्यापक यांना एक वेगळी खोली दिली जाते जिथे ते काम करत असतात.

माझ्या शाळेत प्रवेश घेताच माता सरस्वती चे मंदिर असते जिथे आम्ही दररोज जाऊन प्रार्थना करतो. प्रार्थना झाल्यावर माता सरस्वती चा आशीर्वाद घेऊन आम्ही आमच्या अभ्यासाला सुरुवात करतो.

माझ्या शाळेत प्रत्येक वर्ग खोलीत विद्यार्थ्यांना बसण्याकरिता टेबल आणि खुर्ची ची व्यवस्था केलेली आहे. आणि उन्हाळ्यात विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून प्रत्येक खोली मध्ये पंखे लावले गेले आहेत.

आमच्या शाळेत प्रत्येक वर्गा बाहेर एक कचरा पेटी ठेवलेली आहे. ज्यामध्ये आम्ही आमच्या वर्गातला कचरा टाकतो आणि आमचा वर्ग आम्ही स्वच्छ ठेवतो. आमच्या शाळेत प्रत्येक वर्गात एक मोठा ब्लॅकबोर्ड आहे जिथे आमचे शिक्षक आम्हाला शिकवतात.

सोबतच आमच्या शाळेत टेक्नॉलॉजी चा पुरेपूर वापर केलेला आहे. ब्लॅकबोर्ड सोबतच आमच्या शाळेत प्रत्येक वर्गात एक प्रोजेक्टर ठेवलेला आहे. ज्यावर आमचे शिक्षक आम्हाला चित्रे वप्रेसेंटेशनचा वापर करून सुद्धा शिकवतात.

आमच्या शाळेत एकूण 50 शिक्षक आणि शिक्षिका आहेत. प्रत्येक शिक्षक वेगवेगळ्या वर्गाला वेगवेगळे विषय शिकवतात. आमच्या शाळेतील सर्व शिक्षक त्यांच्या विषयांमध्ये खूप गुणवंत आहे ज्यामुळे आम्हाला कसला पण प्रश्न असला तर त्याचे उत्तर आमचे शिक्षक आम्हाला देतात.

आमच्या शाळेत प्रत्येक शनिवारी शारीरिक शिक्षणचा पिरेड असतो. ज्यामध्ये आम्हाला आमचे शिक्षक व्यायाम व योग शिकवतात. आमच्या शाळेत खेळांना पण महत्व दिले जाते. आमचे शिक्षक आम्हाला वेगवेगळे खेळ शिकवत असतात आणि त्या खेळांचे महत्त्व सुद्धा समजावतात.

व्यायाम, योग आणि खेळ खेळल्याने आमचे स्वास्थ चांगले राहते आणि आम्ही मन लावून अभ्यास करू शकतो. आमच्या शाळेतील मुख्याध्यापक हे खूप शांत आणि निर्मळ व्यक्ती आहेत ते आम्हाला दररोज काही नवीन शिकवतात व शिक्षणाचे महत्त्व समजावतात.

जेव्हापासून आमचे मुख्याध्यापकांनी आमच्या शाळेची व्यवस्था सांभाळली आहे तेव्हापासून आमच्या विद्यालयाची गुणवत्ता व प्रतिष्ठा वाढली आहे. आमच्या शाळेत एकूण आठ चपराशी आणि एक द्वारपाल आहे.

आमच्या शाळेतील चपराशी शाळेचे छोटी-मोठी काम बघतात. काम जसे शिक्षकांना चाय पाणी देणे, शाळेची साफसफाई करणे, प्रत्येक पिरेड नंतर बेल वाजविणे.

माझ्या शाळेतील द्वारपाल प्रत्येक शाळेत येणाऱ्या व्यक्तीवर दृष्टी ठेवतात जेणेकरून इतर कोणी शाळेत प्रवेश करू नये. आमच्या शाळेच्या द्वारपाल यांचे नाव रमेश आहे. ते आम्हाला दररोज स्कूल बस मधून खाली उतरतात आणि कधी कधी ते आम्हाला चॉकलेट सुद्धा देतात.

रमेश काका सर्व विद्यार्थ्यांवर प्रेम करतात. माझ्या शाळेसमोर मोठा बगीचा आहे ज्यामध्ये लहान लहान गवत लागलेली आहेत. त्या बगीच्या मध्ये आम्ही कधीकधी जेवायला जातो. त्या बगीच्यामध्ये अनेक प्रकारच्या फुलांची झाडे लावली गेली आहे.

त्या बगिच्याला पाणी देणे व आमच्या शाळेतील सर्व झाडांची देखरेख करणे आम्हा सर्वांचे कर्तव्य आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक शनिवारी त्या झाडांची काळजी घेतो. कारण या झाडांमुळे व फुलांमुळे आमच्या शाळेची सुंदरता वाढते.

आमचे शिक्षक आम्हाला झाडांचे महत्त्व सांगतात व झाडे लावायला सांगतात. माझ्या शाळेच्या मागे एक मोठा मैदान आहे जिथे आम्ही सर्व विद्यार्थी खेळत असतो. याच मैदानात आम्ही दररोज प्रार्थना करतो.

आमच्या शाळेच्या परिसरात पुष्कळ मोठे झाडे लावलेली आहेत. ज्यामुळे आमच्या शाळेचे वातावरण छान राहते आणि निसर्गाची सुंदरता आम्हा सर्वांना बघायला मिळते. माझ्या शाळेमध्ये नेहमी वेग वेगळ्या स्पर्धेचे आयोजन केले जाते.

स्पर्धा जशी चित्र कला, वाद-विवाद, कविता, आणखी वेगवेगळे खेळ आयोजित केले जाते. या स्पर्धांमध्ये आम्ही सर्व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी होतो. आणि स्पर्धांमध्ये जिंकलेल्या विद्यार्थ्यांना पुरस्कार सुद्धा दिली जातात.

त्यामधील एका स्पर्धेत मी भाग घेतलेला होता. मी चित्रकला स्पर्धेत भाग घेतला होता ज्यामध्ये मी एक सुंदर मोर चे चित्र काढलेले होते. आणि त्याकरिता मला पहिले बक्षीस मिळालेले होते. त्या दिवशी मला पहिल्यांदा व्यासपीठ वर बोलावून सर्व विद्यार्थ्यां समोर पुरस्कार दिलेले होते.

ही गोष्ट माझ्यासाठी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट होती मला पहिल्यांदा स्वतःचा गर्व वाटत होता. जेव्हा ही गोष्ट मी माझ्या आई वडिलांना सांगितले तेव्हा ते खूप आनंदी झाले आणि त्यांनी मला चित्रकला मध्ये माझे भविष्य बनवण्याकरिता प्रोसाहान दिले.

माझ्या शाळेतील मैदान मोठा असल्यामुळे आमच्या शाळेत जिल्हास्तरीय स्पर्धा केल्या जातात. यामध्ये इतर शाळेतील विद्यार्थी सुद्धा भाग घ्यायला येतात. आमच्या शाळेतील विद्यार्थी सुद्धा या स्पर्धांमध्ये भाग घेतात व अनेक विद्यार्थी या स्पर्धांमध्ये पुरस्कार प्राप्त करतात.

आमच्या शाळेत जिल्हास्तरावर कबड्डी, खोखो, हॉकी, फुटबॉल, वॉलीबॉल, बॅडमिंटन, क्रिकेट यासारखे खेळांची स्पर्धा केली जाते.

माझ्या शाळेत प्रत्येक वर्षी 15 ऑगस्ट ला स्वातंत्र्य दिन व 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिवस साजरा केला जातो. या दिवशी आमच्या शाळेतील एन सी सी चे विद्यार्थी परेड करतात. त्यानंतर आमच्या शाळेचे मुख्याध्यापक भारताचा झेंडा फडकवतात.

सोबत आमच्या शाळेत प्रत्येक वर्षी वार्षिक कार्यक्रम सुद्धा केला जातो. ज्यामध्ये अनेक सांस्कृतिक स्पर्धा व कार्यक्रम होतात. आमच्या शाळेत प्रत्येक धर्माचे सण साजरी केली जाते.

माझ्या शाळेच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेत गुण नेहमीच छान येतात कारण आमचे शिक्षक आम्हाला खूप छान शिकवतात. माझी शाळा ही आमच्या गावात प्रथम क्रमांकावर आहे. आणि ह्या गोष्टीचा मला गर्व सुद्धा आहे.

माझ्या शाळेमुळे मला खूप काही जीवनात शिकायला मिळते. एक चांगली शाळा व एक चांगला शिक्षक एक चांगला विद्यार्थी घडवतो.


तर मित्रानो हा होता माझी शाळा मराठी निबंध. तुह्माला हा निबंध कसा वाटलंय ते मला नक्की कळवा. जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर याला तुमच्या मित्र आणि मत्रिणींना व भाऊ बहिणीला share करायला विसरू नका.

Sharing is caring!

Leave a Comment