मराठी निबंध होळी । Holi Festival Essay In Marathi Language

आज आपण होळी वर मराठी निबंध (Holi Festival Essay In Marathi Language) लिहिणार आहोत. जर तुम्हाला होळी वर आणखी निबंध पाहिजे असतील तर ते तुम्हाला आमच्या वेबसाईट वर मिळेल. आजचा निबंध आम्ही 600 ते 700 शब्दात लिहिलेला आहे. हा निबंध मी वर्ग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 च्या विद्यार्थ्यांकरिता लिहिलेला आहे.

या लेख मध्ये आज आम्ही होळी वर एकूण दोन निबंध लिहिलेले आहेत. या दोन निबंध पैकी तुम्हाला जो निबंध जास्त आवडेल तो तुम्ही लिहू शकता.


मराठी निबंध होळी | Holi Festival Essay In Marathi


होळीचा सण हा हिंदूंचा सण आहे. हा हिंदू धर्मात साजरा होणारा एक मोठा उत्सव आहे. होळीच्या या सणाला रंगांचा सण म्हणूनही ओळखला जातो.

होळी हा सण सर्व धर्मातील लोक उत्साहाने व आनंदाने साजरा करतात. होळी हा रंगांनी भरलेला उत्सव आहे. प्रेमाचा हा सण प्रत्येक धर्म, पंथ, जातीचे बंधन उघडतो आणि बंधु तेचा संदेश देतो.

या सणाला प्रेमाचा सण देखील म्हणतात. कारण या दिवशी प्रत्येक जण आपल्या मित्रांसाठी असलेल्या तक्रारी विसरतो आणि संपूर्ण उत्सव एकमेकांना रंग लावून उत्साहाने साजरा करतो.

होळी हा सण फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. नांदगाव, रुंदावन आणि बरसाने यांची होळी भारतात खूप प्रसिद्ध आहे.

होळी या सणाला बघण्यासाठी परदेशातून सुद्धा पर्यटक येत असतात. होळी हा एक प्राचीन उत्सव आहे. होळी सण सोबत अनेक कथा जूडलेल्या आहेत. होळी हा दोन दिवसाचा सण असल्यामुळे होळीच्या पहिल्या दिवशी रात्री होळी पेटवली जाते.

होळी सणाच्या प्रथम दिवशी जी होळी पेटवली जाते त्यामागे एक पौराणिक कथा आहे. ही कथा भगवान विष्णू आणि त्यांचा भक्त प्रल्हाद व त्याचे वडील हिरण्यकश्यप ची आहे.

खूप अगोदर हिरण्यकश्यप नावाचा एक असुर राजा होता. त्याला प्रल्हाद नावाचा मुलगा आणि होलिका नावाची बहिण होती. प्रल्हाद हा असूर जातीत जन्माला आलेला होता. तरी सुद्धा त्याचा स्वभाव खूप शांत होता.

प्रल्हाद हा भगवान विष्णूचा खूप मोठा भक्त होता. परंतु प्रल्हाद च्या वडिलांची इच्छा होती की तो भगवान विष्णूची उपासना करणे सोडून त्यांची उपासना करावी.

पण भक्त प्रल्हाद ने विष्णू देवाची आराधना करणे सोडले नाही. हे बघून हिरण्यकश्यपला खूप राग आला त्यांनी प्रल्हादाला मारून टाकण्याचा निर्णय घेतला.

प्रल्हाद ला मारण्यासाठी त्याच्या वडिलांनी त्याला अग्नीत जाळून टाकण्याचा निर्णय घेतला. याकरिता त्यांनी स्वतःच्या बहिणीची मदत घेतली.

त्याने त्याच्या बहिणीला प्रल्हाद ला मांडीवर बसवून आगीत बसायला सांगितले. होलिका ला देवाकडून वरदान मिळालं होतं की तिला कोणती अग्नी हानी करणार नाही.

याच कारणामुळे होलिका तिच्या भावाची आज्ञा पाळत प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसली. परंतु भगवान विष्णु यांचा आशीर्वाद असल्यामुळे प्रल्हाद अग्नीतून सुख रूप बाहेर निघाला. उलट या अग्नीत होलिका जळून राख झाली.

हाच तो दिवस होता ज्या दिवशी वाईट वर चांगल्याचा विजय झाला आणि होळी सणाचा जन्म झाला. आणि त्या दिवशीपासून प्रत्येक वर्षी आपण होळी हा सण साजरा करतो.

होलिका दहन करण्यासाठी गवत आणि कोरडे लाकूड जमा केले जाते. सोबतच शेणाचा वापर सुद्धा केला जातो. होळी पेटवण्याचा आधी सर्व महिला होळीची पूजा करतात आणि मग होलिका दहन केले जाते.

होळीच्या दुसऱ्या दिवसाला रंगपंचमी म्हणतात. हा दिवस खुप मजेशीर आणि लहान मुलांकरिता आनंदाचा दिवस असतो. या दिवशी लहान पासून ते मोठ्या लोकांपर्यंत  सकाळी लवकर उठतात आणि नातेवाईकांच्या व मित्रांच्या घरी जातात आणि त्यांच्याबरोबर होळी खेळतात.

होळीचा दुसरा दिवस लहान मुलांसाठी खूप महत्त्वाचा असतो. होळीच्या काही दिवसा अगोदर मुले वेगवेगळ्या प्रकारची पिचकारी आणि फुगे बाजारातून घेतात.

या दिवशी लहान मुले आपल्या मित्रांसह पिचकारीने रंग उधळून होळीचा आनंद घेतात. त्यादिवशी सर्व लोक एकमेकांना रंग लावतात व एकमेका सोबत प्रेम वाटतात.

पूर्वीच्या काळी होळीमध्ये निसर्गा पासून बनविलेले रंग वापरले जायचे. पण आजच्या रंगात बरेच रसायने मिसळली असतात. ही रसायने आपल्या त्वचेला नुकसान दायी असतात. रंगांच्या उत्सवात आपण रासायनीक रंगा पासून दूर राहायला हवे आणि नशेली पदार्थांचे सेवन बंद करायला हवे.

लहान मुलांना सुद्धा काळजी घ्यायला हवी की ते असले रंग वापरू नयेत जे त्यांच्याकरिता हानिकारक आहेत. हेच कारण आहे की मुलांनी वडिलांच्या देखरेखीखाली होळी खेळायला पाहिजे.

शक्य असल्यास मुलांनी फुगे वापरू नयेत. कारण ह्यामुळे एखाद्याचे नुकसान होऊ शकते. होळीचा सण हा वाईट वर चांगल्याचा विजय मिळविण्याचा प्रतीक मानला जातो. या सणातून आपल्याला आणखी एक धडा मिळतो की आपण कधीही अभिमान बाळगू नये कारण अहंकार आपल्या विचार करण्याची शक्ती नष्ट करतो.


Holi Festival Essay In Marathi Language


मित्रांनो भारता हा सणांचा देश आहे. भारतात दरवर्षी बरेच सण साजरे केले जातात. होळी हा त्यातील एक महत्त्वाचा सण आहे. होळी हा हिंदू धर्माचा सण आहे. हिवाळ्याच्या शेवटी आणि वसंत ऋतू च्या सुरवातीला होळी हा सण साजरा केला जातो.

होळी हा आनंद आणि उत्साहाचा रंगीबेरंगी उत्सव आहे. होळी हा रंगाचा सण आहे. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळी हा सण प्रत्येक वर्षी साजरा केला जातो.

होळी हा एक महत्वाचा सण आहे ज्याला धार्मिक आणि पौराणिक महत्त्व आहे. होळीचा सण वाईटावर सत्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. या उत्सव मागे एक खूप पौराणिक कथा आहे.

प्राचीन काळी हिरण्यकश्यप नावाचा एक असुर राजा होता. त्याने ब्रम्हा कडून वरदान मिळूवून मृत्यू वर विजय मिळवलेला होता. राजा हिरण्यकश्यपला देवावर विश्वास नव्हता. त्याला त्याच्या सामर्थ्याचा खूप अभिमान झालेला होता. त्यामुळे तो हा विचार करायला लागला की त्याला कोणीही मारू शकत नाही.

काही दिवसांनी त्याला प्रल्हाद नावाचा एक मुलगा झाला. प्रल्हाद हा भगवान विष्णूचा मोठा भक्त होता. दुसरीकडे प्रल्हादाचे वडील हिरण्यकश्यप भगवान विष्णूचे विरोधी होते.

हिरण्यकश्यप ने आपल्या मुलाला भगवान विष्णूची भक्ती करण्यापासून थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण प्रल्हाद ने हिरण्यकश्यपचे ऐकले नाही. तेव्हा त्यांनी प्रल्हाद ला ठार मारण्याचा प्रयत्न सुरू केला.

राजा हिरण्यकश्यप ला होलीका नावाची एक बहीण होती. होलिकाला देवाकडून वरदान मिळालं होतं की तिला आग लागणार नाही. प्रल्हाद ला ठार मारण्यासाठी किती तरी प्रयत्न करून झाल्यानंतर हिरण्यकश्यपने आपल्या बहिणीची मदत घेतली.

होलीकाने तिच्या भाऊ हिरण्यकश्यपची मदत करण्यास सहमती दर्शवली आणि होलीकाला प्रल्हाद बरोबर आगीत बसवण्यात आले.

परंतु भगवान विष्णूच्या आशीर्वादामुळे प्रह्लाद चे नुकसान झाले नाही. या उलट त्या आगीमध्ये होलिका जळाली. त्यानंतर या दिवशी भारतात प्रत्येक वर्षाला होलिका दहन फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो.

होळी हा दोन दिवसाचा सण आहे. ज्यामुळे होळीच्या पहिल्या दिवशी होलिका दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते.

होळीच्या दुसऱ्या दिवशी सर्व लोक एकत्र येतात व रंगाचा हा सण साजरा करतात. रंगपंचमीच्या दिवशी सर्व लोक एकमेकांच्या घरी जाऊन रंग लावतात आणि निर निराळे पदार्थांचा आनंद घेतात.

जशी होळी हा सण वाईट वर चांगल्याच्या विजय चे प्रतीक आहे. या दिवशी लोक सर्व भेदभाव विसरून तुटलेल्या संबंधांना जोडतात आणि एकमेकांबरोबर प्रेम वाटतात.

होळी हा सण एकमेकांना रंग लावून गुलाल उडवून साजरा केला जातो. या दिवशी सर्व एकमेकांना मिठी मारून होळी सण साजरा करतात.

होळीच्या दिवशी होळी चे गाणे लावून सर्व आपल्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत होळी हा सण साजरा करतात. होळीच्या या दुसऱ्या दिवशी रंग खेळून झाल्यावर सर्व लोक एकमेकांच्या घरी जाऊन नमस्कार करतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात.

होळी हा एक असा सण आहे जो ठिकाण आणि संस्कृतीनुसार वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. काही ठिकाणी होळीच्या दिवशी पांढरा पोशाख घालण्याची परंपरा आहे. त्याच दिवशी एकमेकांना आपले प्रेम व बंधुता दर्शविण्यासाठी मिठी मारली जाते.

होळी सणाला काही लोक चुकीच्या पद्धतीने साजरे करतात. ते या दिवशी नशेली पदार्थ ग्रहण करतात आणि इतर लोकांच्या तोंडावर रंगाच्या जागेवर चिखल, अंडे याचा वापर करतात, जी गोष्ट बरोबर नाही.

आपण सर्वांनी स्वच्छ होळी खेळली पाहिजे. आपण सर्व लोकांना उपक्रम सोडण्यासाठी आणि योग्य भावनेने होळी हा सण साजरा करण्यासाठी प्रेरित केले पाहिजे.

होळी हा सण रंगांचा सण आहे. होळी हा सण आनंद पसरवण्याचा सण आहे. दारू पिऊन लोकांशी वाईट वागणूक करण्याचा नाही.


मित्रांनो हे होते होळी विषयावर मराठी मध्ये निबंध (Holi Festival Essay In Marathi). तुम्हाला हे निबंध कसे वाटले ते मला कमेंट च्य माध्यमातून नक्की कळवा. व ह्या निबंधांला अनेक मराठी लोकांपर्यंत पोहोचण्यात आम्हाला मदत करा.

हा निबंध जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्या करिता तुम्ही खाली दिलेल्या सोशियल मीडियाच्या बटनांचा वापर करू शकता. धन्यवाद !

Sharing is caring!

Leave a Comment