होळी मराठी निबंध । Holi Essay In Marathi

मित्रांनो आज आपण होळी वर निबंध (Holi essay in marathi) लिहूया. आज आपण class १, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९, १०, ११, १२ च्या विद्यार्थ्यांसाठी निबंध लिहिणार आहोत. आज आम्ही पूर्ण तीन निबंध लिहिलेले आहेत ज्यामध्ये तुम्हाला 200 शब्दा पासून ते ७०० शब्दांपर्यंत निबंध मिळेल.

तुम्हाला जितका निबंध लिहायचा असेल तितका तुम्ही लिहू शकता. इथे आम्ही वेगवेगळ्या प्रकाराने निबंध लिहिलेले आहे तर तुम्हाला जो निबंध आवडेल तो तुम्ही लिहू शकता.


होळी वर मराठी निबंध क्र. १ । Holi Essay In Marathi


परिचय

होळी हा भारताचा महत्वपूर्ण उत्सव आहे. ज्याला प्रत्येक वर्षी भारतातील लोक मोठ्या धूम धामणे साजरा करतात. होळी हा रंगांचा उत्सव आहे. भारतात होळी हा उत्सव फाल्गुन च्या महिन्यामध्ये साजरा केला जातो.

होळी हा सण हिंदूंचा सण आहे तरीपण हा सण सर्व धर्माची लोक मिळून साजरा करतात. लहान मुलांसाठी होळीचा हा सण खूप महत्त्व ठेवतो. होळीचा हा सण येताच सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो.

भारतात प्रत्येक वर्षी पुष्कळ सण साजरी केली जातात ज्यामधील एक सण होळी आहे. ज्याची स्वतःची एक ओळख आहे. होळी हा सन भारतातील सर्वात प्राचीन सण आहे. ज्याला हजारो वर्षांपासून साजरा केला जातो.

होळी हा सण द्वापर युग मध्ये पण साजरा केला जात होता. म्हटले जाते की श्रीकृष्ण यांना होळी हा हा सण खूप आवडत असायचा. होळी हा एक असा सण आहे ज्याला वाईट वर चांगल्याची विजय चे प्रतीक मानले जाते.

होळी हा रंगांचा आणि आनंद वाटण्याचा सण आहे. होळी हा एक असा सण आहे ज्याला साजरा करण्यासाठी विदेशातून सुद्धा पर्यटक येतात.

होळी हा सण का साजरा केला जातो ?

जसे आपल्याला माहिती आहे की होळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजयाचा प्रतीक मानला जातो. तर याला साजरा करण्याच्या मागे एक प्राचीन पौराणिक कथा जुडलेली आहे.

प्राचीन वेळेस एक राजा होता त्याचे नाव हिरण्यकश्यप होते. हा राजा ब्रह्मदेवाची तपस्या करून इतका बलशाली झालेला होता कि त्याने मुत्यू लोका वर सुद्धा विजय प्राप्त केली होती.

राजा हिरण्यकश्यपला वरदान होता की त्याला दिवसा, रात्री मारल्या जाऊ शकणार नाही. त्याला कोणता देवता, मनुष्य किंवा कोणताही जनावर मारू शकणार नाही आणि त्याच्यावर कोणत्या पण शस्त्राचा घात होणार नाही.

हा वरदान असल्यामुळे हिरण्यकश्यपला त्याच्या शक्तीवर खूप अभिमान झालेला होता. त्या अभिमानामुळे तो स्वतःला देव समजायला लागला होता. आणि सर्व साधुसंतांना तो देवाची पूजा करण्यास मनाई करून स्वतःची पूजा करायला लावायचा.

काही दिवसांनंतर त्याला एक मुलगा झाला त्याचे नाव प्रल्हाद होते. तो विष्णू देवाचा खूप मोठा भक्त होता. तर दुसरीकडे हिरण्यकश्यप विष्णू देवाचा विरोधी होता. हिरण्यकश्यप ने आपल्या मुलाला खूप समजावले की त्याने विष्णू ची आराधना करणे बंद करावे आणि आपल्या वडिलांना ची पूजा करावी.

पण प्रल्हाद ने विष्णू देवांची पूजा आराधना करणे सोडले नाही. हे बघून हिरण्यकश्यपने प्रल्हादला मारण्याचा खूप प्रयत्न केला. पण तो प्रल्हादला मारण्यास असफल राहिला. ह्या वेळेस त्याने प्रल्हादला मारण्यासाठी आपल्या बहिणीची मदत मागितली.

हिरण्यकश्यपला होलिका नावाची एक बहीण होती. जी एक राक्षसी होती आणि तिला एक वरदान होता की तिला अग्नी पासून कोणतीही हानी होणार नाही. हिरण्यकश्यपूने आपल्या बहिणीला प्रल्हादला घेऊन अग्नी मध्ये बसायला सांगितले आणि याकरिता होलीका ने स्वीकार केले.

प्रल्हादला मागण्याकरिता होलीका प्रल्हादला घेऊन अग्नीमध्ये बसली. पण प्रल्हाद वर विष्णू देवांचा आशीर्वाद असल्यामुळे त्याला कोणतीही हानी झाली नाही. उलट हिरण्यकश्यप ची बहिण होलिका स्वतः त्या अग्नीमध्ये जळून राख झाली. त्या दिवसापासून भारतात होळी हा सण साजरा केला जातो.

होळी कशी साजरी करतात ?

होळी एक असा उत्सव आहे ज्याला पारंपरिक प्रमाणे दोन दिवस साजरा केला जातो. होळीच्या पहिल्या दिवशी होलिका दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते.

होलिका दहन

होलिका दहन च्या दिवशी सगळे लोकं रात्री होणाऱ्या होलिका दहन साठी काड्या जमा करतात. रात्र होताच सर्वे मिळून होलिका दहन करतात. घरातील महिला होळी जाळण्या अगोदर होळीची पूजा करतात.

व होळी जळल्यानंतर सर्वजण होळी ची परिक्रमा करतात. होळीचे जळणे वाईट वर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. होळी दहन झाल्यानंतर सर्व लोक आपल्या घरी जाऊन दुसर्‍या दिवशी होणाऱ्या रंगपंचमीची तयारी करतात.

रंगपंचमी

हा दिवस लहान मुलांकरिता खूप आनंदाचा दिवस असतो. या दिवशी सर्व मुले आणि मोठे माणसे आपल्या मनातील द्वेष दूर करून एकमेकांना रंग लावतात. या दिवशी सर्व मुले आपापल्या पिचकारी मध्ये रंग भरून एकमेकांवर पिचकारीने रंग उडवतात व सोबतच फुग्यांचा वापर सुद्धा करतात.

इंदोर आणि महाराष्ट्र मध्ये पुष्कळ जागेवर गावात वॉटर टँकर ला हाय प्रेशर जेट सोबत घुमावले जाते. आणि त्यादरम्यान जितके पण लोकांना ते मिळतात त्यांना ते हाय प्रेशर कॅनन चा वापर करून रंगाने रंगवून टाकतात. या दिवशी काही लोक भांग आणि अल्कोहोल चा वापर सुद्धा करतात. 

होळीच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या रंगपंचमी सणाला दुपारपर्यंत खेळले जाते. त्यानंतर सर्व लोक आणि लहान मुले आपापल्या घरी जाऊन आंघोळ करून नवीन कपडे घालतात. कुठे कुठे अंघोळ करण्याकरिता होळीचे जळलेल्या लाकडावर अंघोळीचे पाणी गरम केले जाते.

 ह्याच दिवशी सर्व लोक संध्याकाळी एकमेकांच्या घरी जाऊन एकमेकांना नमस्कार करतात व एकमेका सोबत आनंद वाटतात. या दिवशी प्रत्येक घरी स्वादिष्ट भोजन बनवली जाते आणि ह्याच प्रकारे होळीचा हा सण साजरा केला जातो.


होळी वर मराठी निबंध क्र. २ | Essay On Holi In Marathi


होळी हा सण वसंत ऋतु मध्ये साजरा केला जातो. होळी हा हिंदूंचा पवित्र उत्सव आहे. होळी हा सण प्रत्येक वर्षी पूर्ण भारतात धूम धाम ने साजरा केला जातो. हा उत्सव हिंदू पंचांग अनुसार फाल्गुन मास च्या पौर्णिमेला साजरा केला जातो. या उत्सवाला रंगांचा उत्सव या नावानेसुद्धा ओळखले जाते.

होळी हा असा उत्सव आहे ज्याला प्रत्येक धर्माचे लोक मोठ्या उत्साहाने सोबत मिळून साजरा करतात. रंगानी भरलेला हा उत्सव धर्म, संप्रदाय आणि जाती च्या बंधनाला खोलून भाऊचारा चा संदेश देतो.

रंगांचा उत्सव म्हटला जाणारा हा सण पारंपारिक रुपाने दोन दिवस साजरा केला जातो. होळीच्या पहिल्या दिवशी होलिका दहन केले जाते आणि दुसऱ्याविषयी रंगपंचमी खेळली जाते.

होळी हा एक प्रेमाचा उत्सव आहे, कारण या दिवशी सर्व लोक आपले मतभेद विसरून मैत्रीची सुरुवात करतात आणि एकमेकांना रंग लावून हा उत्सव पूर्ण उत्साहाने सोबत मिळून साजरा करतात.

होळी भारताचा मोठा प्रसिद्ध उत्सव आहे. ज्याला बघायला आणि साजरा करायला विदेशातून सुद्धा पर्यटक येतात. होळी हा सण साजरा करण्यामागे एक पौराणिक कथा जुळलेली आहे.

खूप वर्षा अगोदर एक राजा होता. त्याचे नाव हिरण्यकश्यप होते आणि तो एक राक्षस होता. त्याला एक बहीण सुद्धा होती तिचे नाव होलीका होते. हिरण्यकश्यपला एक प्रल्हाद नावाचा मुलगा सुद्धा होता.

प्रल्हाद च्या वडीलाने प्राचीन काळी आपल्या शक्तीने तिन्ही लोक वर विजय प्राप्त केलेली होती. त्याच्या भीतीने सर्व त्याला देवाच्या रूपात पूजायला लागले.

पण प्रल्हादा लहानणापासूनच विष्णू देवाचा खूप मोठा भक्त होता. जे हिरण्यकश्यपला मान्य नव्हते, कारण हिरण्यकश्यप विष्णू देवाचा विरोधी होता. त्यामुळे हिरण्यकश्यपने प्रल्हादला विष्णू देवाची आराधना करण्यापासून थांबायचे खूप प्रयत्न केले पण तो त्यात असफल राहिला.

त्यामुळे त्याने आपल्या बहीण होलिका ला प्रल्हादला घेऊन अग्नी मध्ये बसायचा आदेश दिला. कारण होलिका ला वरदान होता की तिला कोणतीही अग्नी हानी करणार नाही. ज्याचा फायदा घेऊन हिरण्यकश्यप ला प्रल्हादला मारायचे होते.

पण प्रल्हादला त्या अग्नीपासून कोणतीही हानी झाली नाही. उलट हिरण्यकश्यप ची बहिण त्या अग्नीमध्ये जळून राख झाली आणि त्या दिवशीपासून होलिका दहन केले जाते. हा तोच दिवस आहे ज्या दिवशी वाईट वर चांगल्यांची विषय झाली आणि होळी उत्सवाचा उदय झाला.

होळी सणाच्या पहिल्या दिवशी होलिका दहन करण्याकरिता वाढलेली लाकडे जमा केली जाते. त्यानंतर रात्री रंगपंचमी च्या आदल्या दिवशी होलिका दहन केले जाते. होळी जळण्याचा अगोदर घरातील महिला होळीची पूजा करते आणि त्यानंतर होलिका दहन केले जाते.

होळीचा दुसरा दिवस खूप मोठा आणि मजेदार असतो. या दिवशी सगळे लहान मुले सकाळी उठून पिचकारी मध्ये रंग भरतात आणि होळीचा आनंद घेतात. या दिवशी सर्व एकमेकांना रंग आणि गुलाल लावतात आणि एकमेकांना रंगबिरंगी रंगांनी भरवून टाकतात.

लहान मुलांन साठी हा उत्सव विशेष महत्त्व ठेवतो. कारण या दिवशी लहान मुले रंगांच्या फुग्यांनी आणि पिचकारी ने रंग लावून आपल्या मित्रांसोबत होळीचा आनंद घेतात. होळी हा सगळ्यांचा आवडता उत्सव आहे. या दिवशी सगळे आपले मतभेद विसरून मैत्रीची नवीन सुरुवात करतात आणि आपल्या वाईट प्रवृत्ती वर विजय प्राप्त करतात.


होळी वर मराठी निबंध क्र. ३ | Short Essay On Holi In Marathi


होळी हा सण आपल्या देशातील मुख्य सणा मधील एक आहे. होळी हा सण हिंदू धर्माचा सण आहे. तरीपण या सणाला सर्व धर्माचे लोक मिळून मिसळून साजरा करतात. या सणाला प्रत्येक वर्षी मार्च महिन्यात साजरा केला जातो. ज्याला हिंदी कॅलेंडर अनुसार फाल्गुन महिना म्हणतात.

होळीचा सण भारत देशात सर्व राज्यांमध्ये साजरा केला जातो. हा एक रंगांचा उत्सव आहे. ज्यामध्ये लोक एकमेकांना रंग लावतात. होळी उत्सवाच्या काही दिवस आगोदरच लोक बाजारात जाऊन रंग आणि अभिरुची खरेदी करतात.

सोबतच लहान मुले सुद्धा रंग, फुगे आणि पिचकारी ची खरेदी करतात. होळी सणाच्या काही दिवसा अगोदर बाजारात खूप चहल पहल वाढलेली असते. होळीच्या या उत्सवात लहान मुलांमध्ये वेगळाच उत्साह असतो.

लहान मुले होळीच्या दिवशी खरेदी केलेल्या पिचकारी सोबत एकमेकांवर रंग टाकतात आणि आपल्या मित्रांबरोबर होळीचा आनंद घेतात. रंगपंचमीच्या एक दिवस आगोदर रात्री होलिका दहन केले जाते.

होलिका दहन मध्ये सुकलेली लाकडे, घास-फुस इत्यादी जळविण्यात येते. होळीचा सण साजरा करण्याकरिता सर्वजण आपल्या इच्छेने चंदा देतात. होलिका दहन हे सार्वजनिक पद्धतीने साजरा केला जातो.

सर्वजण यामध्ये समाविष्ट होतात. चंदा घेऊन जमा झालेल्या पैशाचा वापर करून होलिका दहन करिता सुकलेली लाकडे आणि अन्य सामग्री ची खरेदी केली जाते.

होलिका दहन च्या मागे एक पौराणिक कथा आहे. जी वाईटावर चांगल्या ची विजय दर्शविते. होळी हा उत्सव पारंपरिक प्रमाणे दोन दिवस साजरा केला जातो. होळीच्या पहिल्या दिवशी होळीचे दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते.

होळीच्या दिवशी सर्वांच्या घरी गोड आणि अन्य प्रकारचे भोजन बनविली जाते. या दिवशी लहान मुले आणि तरुण एकमेकांना रंग लावून आनंद वाटतात. या दिवशी सर्व एकत्र येऊन एक टोळी बनवितात. ही टोळी आपल्या बरोबर ढोल ताशे घेऊन घुमतात आणि एकमेकांना रंग आणि अबीर लावतात.


तर मित्रानो हे तीन होळी वर मराठी निबंध (holi essay in marathi) तुह्माला कसे वाटले ते आह्माला सांगायला विसरू नका. जर तुह्माला हा निबंध आवडला असेल तर याला सोसिअल मीडिया वर share नक्की करा.

Sharing is caring!

Leave a Comment