हिंदी दिवस मराठी निबंध | Hindi Diwas Essay In Marathi

आजचा आपला निबंधाचा विषय आहे हिंदी दिवस (Hindi Diwas Essay In Marathi). मित्रांनो आपण सर्व लहानपणी शाळेत जातो आणि ज्ञान प्राप्त करतो. शाळेत आपल्याला अनेक विषय शिकवले जातात ज्यामध्ये एक हिंदी विषय सुद्धा असतो.

पण दुःखाची गोष्ट अशी आहे की आज आपण हिंदी भाषेचा वापर करत नाही. हिंदी भाषा वापरताना आपल्याला लाज येते. तर आज आपण हिंदी दिवस वर निबंध (Hindi Diwas Essay In Marathi) लिहिणार आहोत.

मित्रांनो आजचा निबंध आम्ही वर्ग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 च्या विद्यार्थ्यांसाठी लिहिलेला आहे. तुम्ही हा निबंध आपल्या कॉलेज प्रोजेक्ट किंवा स्पर्धेसाठी सुद्धा वापरू शकता.


Hindi Diwas Essay In Marathi


प्रत्येक वर्षी 14 सप्टेंबरला पूर्ण भारतात हिंदी दिवस साजरा केला जातो. हिंदी भाषा ही आपली राष्ट्रभाषा आहे. तिचा सन्मान आपण सर्वांनी करायला हवा.

14 सप्टेंबर च्या दिवशी हिंदी भाषेला सन्मान दर्शनाकरिता हिंदी दिवस साजरा केला जातो. हिंदी भाषा ही भारत देशात बोलली जाणारी मुख्य भाषा आहे.

जसे आपणा सर्वांना माहिती आहे की आपल्या देशात विविध भाषा बोलल्या जातात आणि त्या सर्व भाषा शिकणे सोपे नाही. आणि याच कारणामुळे हिंदी भाषेला पूर्ण देशात शिकवले आणि बोलले जाते.

हिंदी भाषा आपल्या देशाच्या संस्कृती आणि संस्काराची प्रतिबिंब आहे. भारत देशात जास्तीत जास्त लोकांना हिंदी भाषा बोलता आणि लिहिता येते.

14 सप्टेंबर 1949 रोजी भारतीय संविधान ने हिंदी भाषेला राष्ट्रभाषा म्हणून स्वीकार केले होते. आपल्या राष्ट्रभाषा हिंदी मुळेच आपल्याला आपल्या संस्कृतीचे ज्ञान होते.

हिंदी भाषा ही विश्वातील सर्वात प्राचीन आणि समृद्ध भाषा आहे. हिंदी भाषा खूप साधी आणि कुणाला पण बोलण्यासाठी आणि समजण्यासाठी सोपी असते.

हिंदी भाषा आपल्या भारत देशाला एकत्र ठेवण्याचे कार्य करते. हिंदी दिवसाला साजरा करणे हे आपल्या राष्ट्रभाषेच्या सोबतच आपल्या संस्कृतीवर जोर देण्याचे एक महान कार्य आहे.

हिंदी दिवस आपल्याला आपल्या संस्कृती सोबत बांधून ठेवण्याचे कार्य करतो. जेव्हा आपण प्रत्येक वर्षी हिंदी दिवस साजरा करतो तेव्हा आपण आपली मातृभाषा विसरून स्वतःला एक भारतीय असण्याची आठवण करून देत असतो.

या दिवशी प्रत्येक भारतीय स्वतःचा धर्म विसरून भारतीय होण्याचा धर्म निभवतो. हिंदी भाषा दरवर्षी 14 सप्टेंबरला आपली खरी ओळख आपल्याला करून देतो. जी ओळख एक भारतीय होण्याची असते.

आज जेव्हा इंग्रजी भाषा जगभर स्वीकारली जात आहे. त्यामुळे इंग्रजी भाषेचे महत्त्व खूप वाढले आहे. पण त्यामुळे आपल्याला आपली मातृभाषा विसरायला नाही पाहिजे.

जेव्हा आपले देशाचे प्रधानमंत्री दुसऱ्या देशात जातात. तेव्हा ते तिथे फक्त हिंदी भाषा मध्ये संवाद करतात. आपल्याला आपल्या देशाचा आणि आपल्या हिंदी भाषेचा अभिमान वाटला पाहिजे.

मित्रांनो बाहेर देशातील लोक सुद्धा आपली हिंदी भाषा शिकण्यासाठी भारतात येतात. आपल्या भारतात हिंदी विद्यापीठ तयार केली गेली आहेत. जीते हिंदी भाषा आणि इतर भाषा शिकवल्या जातात.

आपण सर्व हिंदी भाषा बोलतो परंतु बऱ्याच वेळी इंग्रजी शब्द आपल्या वाक्यांमध्ये वापरले जातात. आज सुद्धा काही लोक समजतात की जो व्यक्ती हिंदी बोलतो त्यापेक्षा इंग्रजी बोलणारा हुशार आणि प्रभावशाली असतो.

परंतु इंग्रजी हे सुद्धा हिंदी सारखीच एक भाषा आहे जिल्हा कोणीपण शिकू शकतो. इंग्रजी भाषेचा कोणाच्या बुद्धिमत्तेशी कोणताही संबंध नाही.

तरीसुद्धा आज इंग्रजी भाषेत बोलण्यात लोकांना जास्त अभिमान वाटतो आणि या कारणामुळे बरेच हिंदी शब्द वापरले जात नाहीत. आणि हेच कारण आहे की आपण आपली राष्ट्रभाषा विसरत जात आहोत.

आपल्याला हे अजिबात होऊ द्यायला नाही पाहिजे हिंदी भाषेच्या विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजे. यासाठी आपण हिंदी भाषेचे शिक्षण आपल्या मुलांना योग्य रीतीने दिले पाहिजे. जेव्हा संपूर्ण भारत हिंदी भाषा बोलू शकेल तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने हिंदी भाषेचे आदर करू शकतो.


Short Essay On Hindi Diwas In Marathi


आपल्या भारत देशात दररोज कोणता ना कोणता सण साजरा केला जातो. आणि असे बरेच महत्वाचे दिवस आहेत ज्यांचे महत्त्व आपल्या सर्वांसाठी खूप मोठे आहे.

आपण सर्व दरवर्षी असाच एक दिवस साजरा करतो. हा दिवस आपण 14 सप्टेंबर रोजी साजरा करतो. हा दिवस दुसरा कोणताच नाही तर हिंदी दिवस आहे.

भारत देशात हजारो संस्कृती आणि भाषा आहेत ज्यामुळे आपल्या भारतात बऱ्याच भाषा बोलल्या जातात आणि सर्व भाषा समजून घेणे आणि एकमेकांशी संवाद साधणे हे खूप अवघड असते.

आणि या समस्यांचे निराकरण ही आपल्या देशाची राष्ट्रभाषा म्हणजेच हिंदी आहे. आपल्या भारताच्या संविधान मध्ये हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिला गेला आहे. हिंदी भाषा ही आज जगातील सर्वाधिक बोलली जाणाऱ्या भाषांमधील एक भाषा आहे.

आपल्या हिंदी भाषेला सन्मान देण्याकरिता आपल्या देशात प्रत्येक वर्षी 14 सप्टेंबरला हिंदी दिवस साजरा केला जातो. यादिवशी आपल्या देशात राष्ट्रीय एकता दिवस सुद्धा साजरा केला जातो.

आपल्या देशाला आजादी मिळाल्यानंतर 14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारली गेली. 14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदी भाषेला देशाची मातृभाषा होण्याचा मान मिळाला.

14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा करण्याचा निर्णय 1953 मध्ये घेण्यात आला होता. आणि त्या दिवसापासून आपण सर्वे 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा करत असतो.

हा दिवस हिंदी भाषे विषयी जागरूकता वाढवण्यासाठी देखील साजरा केला जातो. 14 सप्टेंबर हिंदी दिनानिमित्त सर्व शाळांमध्ये बरेच कार्यक्रम आयोजित केले जातात. या दिवशी शाळेत मुलांना अनेक प्रकल्प देखील दिले जातात आणि शाळेमध्ये वेगवेगळे स्पर्धा आयोजित केले जाते.

सगळे विद्यार्थी उत्साहाने वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेतात. या दिवशी वाद-विवाद, भाषणे, कविता आणि निबंध सारख्या स्पर्धा आयोजित केल्या जातात.

पण आज प्रत्येक तरुण आपल्या जीवनात इतके गमावले आहेत की त्यांना हिंदी दिवस लक्षात सुद्धा राहत नाही. आज आपल्या देशात इंग्रजीची इतके महत्त्व वाढले आहे की हिंदी भाषेला योग्य आदर देण्यात येत नाही. आणि या मागे सर्वात मोठे कारण आहे की आज लोक हिंदी भाषेचा तिरस्कार करतात, लोकांना हिंदी मधे बोलायला लाज येते.

आज लोक हे समजतात की जो माणूस हिंदी मध्ये बोलतो तो कमी शिकलेला असतो आणि त्याचा आदर केला जात नाही. जोपर्यंत आपण सर्व आपल्या देशाच्या मातृभाषेचा आदर करीत नाही. तोपर्यंत आपण हिंदी भाषेला सन्मान मिळवून देऊ शकत नाही.

जेव्हा आपण आपल्या हिंदी भाषेला दुसऱ्या भाषा पेक्षा कमजोर समजतो. याचाच अर्थ आपण आपल्या देशाबद्दल अनादर करत असतो. आपण सर्व भारतीयांना आपल्या राष्ट्रभाषेवर अभिमान असायला हवा.

जर आपल्याला आपल्या राष्ट्रभाषेवर अभिमान नसेल तर दुसऱ्या प्रांतातील लोक आपल्या भाषेचा आदर का करतील. देशाची मातृभाषा ही देशाची धरोवर असते. ज्याप्रमाणे आपण देशाच्या तिरंग्याचा आदर करत असतो त्याप्रमाणे आपल्याला आपल्या राष्ट्रीय भाषेचे आदर केले पाहिजे.


मित्रांनो जर तुम्हाला हिंदी दिवस वर हा मराठी निबंध (Hindi Diwas Essay In Marathi) आवडला असेल. तर तुम्ही हा निबंध आपल्या मित्र आणि भाऊ वहिनी सोबत शेअर करू शकता. तुम्ही आम्हाला ह्या निबंध बद्दल कमेंट्स द्वारे तुमची राय देऊ शकता.

Sharing is caring!

Leave a Comment