छत्रपती शिवाजी महाराज वर मराठी निबंध

मित्रांनो आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांवर निबंध (Chatrapati Shivaji Maharaj Essay In Marathi) लिहूया. तुम्ही शिवाजी महाराजांवर लिहिलेला दुसरा निबंध खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून बघू शकता.

आजचा निबंध वर्ग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 च्या विद्यार्थ्यांकरीता लिहिलेला आहे. हा निबंध तुम्ही तुमच्या शाळेत किंवा कॉलेज मधील प्रोजेक्टसाठी लिहू शकता.


छत्रपती शिवाजी महाराज वर मराठी निबंध


शिवाजी महाराज मराठा राज्याचे संस्थापक होते. शिवाजी महाराजांनी सर्व मराठ्यांना एकत्र आणून भारतात मराठा साम्राज्य स्थापन केले होते.

शिवाजी महाराज पहिले हिंदू होते ज्यांनी हिंदूंचे साम्राज्य स्थापित केले आणि मुघलांना भारतातून पळविले. शिवाजी महाराजांचा जन्म त्या लोकांसाठी एक वरदान होते. जे मुघल शासनाच्या अत्याचारा मुळे खूप त्रस्त झाले होते.

शिवाजी महाराज या लोकांसाठी एक नवीन आशेचे किरण बनले जे मुघलांच्या अत्याचारांमुळे खूप त्रास सहन करत होते. छत्रपती शिवाजी महाराज चा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला.

शिवाजी महाराजांना त्यांची आई जिजामाता “शिवबा” नावाने सुद्धा हाक मारत होती. शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज बीजापूरच्या राज्या कळे उच्च पदावर होते.

शहाजी राजे हे पुणे जिल्ह्याच्या काही भागांचे जागीरदार सुद्धा होते. शिवाजी महाराजांची आई जिजाबाई ही सिंदखेड चे प्रमुख लखुजीराव जाधव यांची मुलगी होती.

जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना लहानपणी पासून लढायला शिकवले. त्यांनी शिवाजीला अन्याया विरुद्ध लढायला सांगितले. जिजाबाईं ने शिवाजी महाराजांना सांगितले की कितीही अडचणी आल्या तरी सुद्धा अन्याय विरुद्ध लढा देणे थांबवू नये, कारण शेवटी अन्याय विरुद्ध चांगल्याचा विजय होत असतो.

जिजामाताच्या या शिकवण मुळे शिवाजी महाराजांवर खूप मोठा प्रभाव झाला होता. जेव्हा शिवाजी महाराज लहान होते तेव्हापासून जिजामाता त्यांना चांगल्या शिकवणी देऊन त्यांचे चांगले चरित्र घडवत होत्या.

शिवाजी जन्मता एक पुढारी होते ज्यांनी सह्याद्री पर्वताला पूर्णपणे माहिती करून घेतले होते. त्यांना सह्याद्री पर्वता मधील सर्व प्रांत माहिती झाले होते.

शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी अशी सेना तयार केली ज्यांना ते मावळे म्हणायचे. आणि त्यांनी मराठा स्वराज्य स्थापन करण्याची सुरुवात केली.

शिवाजी महाराजांचे मावळे त्यांच्या स्वराज्य बनवण्याच्या कार्या करता एकत्र आले होते. ते शिवाजी महाराज पासून खूप प्रेरित आणि पूर्णपणे शिवाजी महाराज करिता समर्पित होते. ते सर्व शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्य करिता स्वतःचा जीव सुद्धा द्यायला तयार होते.

काही दिवसानंतर शिवाजी महाराजांचे लग्न साईबाई निंबाळकर सोबत झाले. शिवाजी महाराजांचे लग्न 1640 रोजी झाले. सन 1645 पर्यंत शिवाजी महाराजांनी पुष्कळ किल्ल्यांवर विजय प्राप्त केली होती. त्यामध्ये पुरंदर, सिंहगड या सारखे किल्ले समाविष्ट होते.

हे बघून आदिल शाहला अस्वस्थ आणि शिवाजी महाराजांनी धमक्या दिल्या सारखे वाटायला लागले. त्यामुळे त्याने शिवाजी महाराज चे वडिल शाहाजी भोसले यांना पकडून तुरुंगात टाकायचा आदेश दिला.

त्यानंतर आदिलशहाने शिवाजी महाराज समोर एक अट ठेवली. ती अट अशी होती की जो पर्यंत शिवाजी महाराज आदिलशहाच्या प्रदेशांवर विजय मिळवण्याची मोहीम बंद करणार नाहीत. तोपर्यंत आदिलशहा शाहाजी राजांना तुरुंगातून मुक्त करणार नाही.

ज्या दिवशी शहाजी राजे मरण पावले त्या दिवशी शिवाजी महाराजांनी पुन्हा मुघलांशी लढायला सुरुवात केली. त्यानंतर शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे ला परास्त केले. चंद्रराव मोरे हा बीजापूरचा जागीरदार होता.

शिवाजी महाराजांचा हा आक्रोश बघून आदिलशहा ने त्याच्या सर्वात शक्तिशाली जनरल ला ज्याचे नाव अफजल खान होते, त्याला शिवाजी महाराजांना मारण्याकरिता पाठवले.

अफजल खानने शिवाजी महाराजांना मारण्याकरिता प्रतापगड वर बैठकसाठी बोलावले. शिवाजी महाराज हुशार होते ज्यामुळे त्यांनी अफजल खानच्या बैठक मागचे कारण समजून घेतलेले होते.

शिवाजी महाराजांनी अफजल खानच्या योजनेच्या विरुद्ध स्वतःची योजना बनवली. जेव्हा ते दोघे बैठक साठी मिळाले तेव्हा अफजल खानने शिवाजी महारांजाना मारण्याचा प्रयत्न केला.

परंतु शिवाजी महाराज इतके वेगवान होते की त्यांनी अफजल खान च्या प्रयत्नाला असफल केले आणि स्वतः त्यावर पलटवार केला.

त्यावेळेस शिवाजी महाराजांनी पोशाखच्या खाली एक धातूचे Armor घातले होते. जेव्हा अफजलखानाने शिवाजी महाराजांवर हल्ला केला तेव्हा शिवाजी महाराजांनी वाघाच्या पंज्या सारख्या शस्त्रानी अफजल खान वर पलटवार केला आणि अफजल खान ला मारून टाकले.

त्यानंतर मावळ्यांनी जे जंगलांमध्ये लपलेले होते, अफजलखानाच्या सैनिकांवर हल्ला केला आणि त्यांना मारून टाकले. त्यावेळेस जवळपास 3000 अफजल खानचे सैनिक मावळ्यांच्या हातून मारले गेले.

ही युद्धाची पद्धत शिवाजी महाराजांचे सर्वात मोठे शस्त्र होते. या युद्ध पद्धतीला गनिमी युद्ध पद्धत नावाने ओळखले जात होते. ही युद्ध पद्धत आजच्या काळात सुद्धा वापरली जाते.

ही घटना शिवाजी महाराजांच्या इतिहासात सर्वात महत्त्वाची विजय होती. कारण ही घटना शिवाजी महाराजांच्या शौर्याला आणि जलद विचार करण्याच्या क्षमतेला दर्शवत होती.

त्यानंतर आदील शाहाणे मोठ्या सेने सोबत रुस्तम झमान ला शिवाजी महाराज विरुद्ध कोल्हापूरच्या युद्धासाठी पाठवले. या युद्धामधे शिवाजी महाराज जिंकले व रुस्तम झमान स्वतः चा जीव वाचवत तिथून पळून निघाला.

या सर्व गोष्टी नंतर शिवाजी महाराज औरंगजेबच्या नजरेत आले आणि मुघल साम्राज्य च्या विरोधात खरे लढा सुरू झाले. त्यानंतर शिवाजी महाराज आणि मुघलांमध्ये अनेक लढा झालेत. यामध्ये शाहिस्ते खानशी लढा आणि  दिल्लीतून सुटका अशा अनेक गोष्टी घडल्या.

शिवाजी महाराज सर्व धर्म व स्त्रियांचा खूप सन्मान करत होते. ज्यामुळे त्यांनी त्यांच्या सैनिकांना कठोरपणे चेतावणी दिली होती की स्त्रियांना कोणत्याही प्रकारचा त्रास आणि हानी देण्यात येऊ नये.

शिवाजी महाराज हिंदुत्वाचे खूप मोठे समर्थक होते. परंतु त्यांनी कधी इतर धर्मांचा अनादर केला नाही. शिवाजी महाराजांनी सर्व धर्मातील लोकांना त्यांच्या सेनेमध्ये सामील केले होते.

शिवाजी महाराज किती तरी वर्ष स्वराज्यासाठी लढत राहिले व अखेर 3 एप्रिल 1680 रोजी शिवाजी महाराजांचा मृत्यू रायगड किल्ल्या मधे झाला. त्यांच्या मृत्यू चे कारण त्याचे आजारपणं होते.


Chatrapati Shivaji Maharaj Essay In Marathi


छत्रपती शिवाजी महाराज मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. ते असे राजा होते जनतेसाठी जगले व त्यांनी गुलामगिरी मध्ये जगण्याला नाकारले.

या शूर वीर व पराक्रमी राज्याला जनता शिवराय, शिवबा, राजे, आणि छत्रपती अश्या अनेक नावाने संबोधत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुण्यातील जुन्नर शहराजवळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.

असे सांगण्यात येते की जिजाबाईंनी आपल्याला शूर वीर पुत्र व्हावा म्हणून शिवनेरी गडावरील शिवाई देवीला प्रार्थना केली होती. आणि हेच कारण होते की त्यांनी आपल्या मुलाचे नाव शिवाजी ठेवले.

शिवाजी महाराजांचे वडील शाहाजी महाराज बीजापूरच्या राज्याच्या सेवेत होते. शिवाजी महाराज जेव्हा लहान होते, तेव्हा त्यांची संपूर्ण जबाबदारी त्यांची आई जिजाबाई वर होती.

जिजा बाई ने शिवाजींना रामायण, महाभारत सारख्या गोष्टी सांगितल्या. जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना राजकारणाचे धडे शिकवणे. त्यांनी दिलेल्या संस्कारामुळे शिवाजी राजे घडले.

वयाच्या पंधराव्या वर्षी काही विश्वासू मावळ्यांना जमवून शिवाजी राजांनी स्वराज्य निर्मिती ची शपथ घेतली. शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणगड जिंकले.

पुढे त्यांनी कोंढाणा, सिंहगड, विजयदुर्ग, लोहगड, पुरंदर, राजगड असे शंभराहून अधिक किल्ले जिंकले. शिवाजी महाराज अत्यंत चतुर होते त्यामुळे त्यांनी युद्धात शक्ती सोबतच बुद्धीचा वापर केला.

शिवाजी राजे सर्व गुण संपन्न होते. ते हिंदुत्व, संस्कृत व मराठी भाषेचे समर्थक होते. परंतु शिवाजी महाराजांनी दुसऱ्या धर्माचा व भाषेचा कधी हि अनादर केला नाही. ते सर्व धर्माचा आणि भाषेचा आदर करत होते.

त्यांच्या सेना मध्ये सर्व धर्माचे सैनिक होते. शिवरायांचे शौर्य, राज्य धर्मपालन, कल्पकथा, संघटन, कौशल्य इत्यादी गुणांनी पारत्रंत्रात पडलेल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.

3 एप्रिल 1680 रोजी राजगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा मुत्यू झाला. या दिवशी सह्याद्री सहित प्रत्येक व्यक्ती रडत होता. स्वतंत्र स्वराज्य ज्या व्यक्तीने निर्माण केले तो जनतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज या दिवशी जनतेपासून दुरावला.


मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांवर निबंध (Chatrapati Shivaji Maharaj Essay In Marathi) तुम्हाला आवडले असणार याची मला खात्री आहे. तुम्ही या निबंध बद्दल तुमचे विचार आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता. आणि जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर याला सोशल मीडियावर शेअर करायला विसरू नका.

Sharing is caring!

Leave a Comment